MVA maha morcha : नार्वेकर, परबांच्या डावामुळे शिंदे-फडणवीसांच्या जोडगोळीचा डाव उधळला!

MVA maha morcha : नार्वेकर, परबांच्या या डावामुळेच शिंदे-फडणवीसांच्या जोडगोळीचा डाव उधळला गेला आणि मोर्चाचे ठिकाण कायम राहिले.
Milind Narvekar, Anil Parab, Eknath Shinde, Devendra Fadnavis, MVA maha morcha
Milind Narvekar, Anil Parab, Eknath Shinde, Devendra Fadnavis, MVA maha morchaSarkarnama

MVA maha morcha : रस्त्यावर उतरण्याचा चंग बांधून शिंदे-फडणवीसांच्या सरकारपुढे एकी दाखविण्यासाठी दंड थोपटलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मोर्चाला परवानगी मिळाली; पण मोर्चाचे मुख्य ठिकाणी असलेल्या रिचर्ड अॅण्ड क्रुडाज कंपनीच्या व्यवस्थापनाला हाताशी धरून कंपनीच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकण्याची व्यवस्थाही या सरकारने केली.

त्यावरून संघर्ष न करता शिवसेनेतील (Shivsena) चाणक्या मानले जाणारे मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) आणि माजी मंत्री अनिल परबांनी (Anil Parab) छुपा डाव टाकून, शिंदे-फडणवीस सरकारच्या पोलिस यंत्रणेला 'हायजॅक' केले. मोर्चाला प्रारंभ होण्याआधी कंपनीला गेट उघडण्याला भाग पाडले. नार्वेकर, परबांच्या या डावामुळेच शिंदे-फडणवीसांच्या जोडगोळीचा डाव उधळला गेला आणि मोर्चाचे ठिकाण कायम राहिले.

Milind Narvekar, Anil Parab, Eknath Shinde, Devendra Fadnavis, MVA maha morcha
Prakash Ambedkar News : आघाडीचा मोर्चा यशस्वी पण आंबेडकरांच्या भूमिकेमुळे ठाकरेंसमोर पेच

गंभीर म्हणजे, परवानगीनंतर कंपनीचे गेट बंद करण्याची सरकारची खेळी महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यांना ठाऊक नव्हती. शिंदे-फडणवीस सरकारच्या भूमिकांविरोधात आघाडीचा आवाज बुलंद करण्यासाठी काढलेला मोर्चा जे. जे. रुग्णालयाजवलच्या रिचर्ड अॅण्ड क्रुडाज कंपनीपासून निघणार हे निश्चित होते. त्याकरिता पसिरात जोरदार तयारीही गेली. परंतु, सरकारी यंत्रणांचा दबाब आणून पहाटे साडेपाच-सहा वाजल्यापासून गेट बंद ठेवण्याची भूमिका कंपनी व्यवस्थापनाने घेतली.

त्यामुळे आंदोलनकर्त्यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे स्पष्ट होते. अशाच या साऱ्या मोर्चाची आखणी करण्यापासून तो ताकदीने रस्त्यावर उतरविण्याच्या तयारीतील नार्वेकर, परबांनी मुंबई पोलिसांतील सहपोलिस आयुक्त आणि अतिरिक्त पोलिसांसोबत फोनाफोनी करून गेट उघण्याची विनंती केली. अर्थात, ठाकरे सरकारमध्ये केलेल्या मदतीची जाणीव करून देतच नार्वेकर, परबांनी या दोघा अधिकाऱ्यांना कंपनीच्या दरावरचे टाळे काढण्यास भाग पाडले.

त्यानंतर कंपनीच्या भूमिकेवर संतापलेल्या या अधिकाऱ्यांनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून टाळे काढण्याचे फर्मान सोडले. त्यानंतरही नकार देणाऱ्या व्यवस्थापनाने पोलिसांचा दबाव आणि नार्वेकर, परबांच्या खेळ्या ओळखून मोर्चाचा मार्ग मोकळा करून दिला.

राज्यात गेल्या काही काळात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष, बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) आणि महाविकास आघाडीतील संघर्ष वाढताना दिसत आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विधानावरुन विरोध प्रचंड आक्रमक झाले आहेत. राज्यपाल यांना हटविण्याची मागणी लावून धरत विरोधकांनी वातावरण निर्माण केले. त्यानंतर पाटील यांच्या विरोधात रस्त्यावर उतरले. विरोधी आवाज बुलंद करण्यासाठी मुंबईत महामोर्चा काढण्यात आला.

Milind Narvekar, Anil Parab, Eknath Shinde, Devendra Fadnavis, MVA maha morcha
फणसाळकरांनी कर्तव्य मानले महत्वाचे : मुलीचे लग्न असूनही महामोर्चाच्या सुरक्षेसाठी ड्यूटीवर

त्यासाठी जोरदार तयारी करुन शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेसह (Congress) या तिन्ही पक्षाने मुंबईत आपआपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बोलून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे आधी मोर्चाला परवानगी नाकारण्यापासून ते शेवटी काही अटींवर मोर्चाला परवानगी देण्यात आली. त्यावरुनही विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारवर आगपाखड केली. या पार्श्वभूमीवर माध्यमांच्या प्रतिनिधींसोबत बोलताना फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. या मोर्चानंतर सतताधारी-विरोधक आमने-सामने आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com