Ravindra Phatak
Ravindra Phatak  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : मनधरणीसाठी सूरतला गेलेले रवींद्र फाटकच एकनाथ शिंदे गोटात सामील

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : बंडखोर नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनधरणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दूत म्हणून सूरतला गेलेले रवींद्र फाटकच (Ravindra Phatak) आता शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. ते सूरतच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्या ठिकाणी संजय राठोड पोचले असून थोड्याच वेळेत दादा भुसे आणि फाटक तेथे पोचणार आहेत. तेथून ते चार्टर्ड प्लेनद्वारे गुवाहटीला जाणार आहेत. याशिवाय शिवसेनेचे आणखी चार ते पाच आमदार शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सूत्रांनी सांगितले. फाटक यांच्या जाण्याने शिवसेनेला मोठा धक्का आहे. (MLA Ravindra Phatak joins Eknath Shinde's group)

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर एकेक नेता त्यांच्या गोटात दाखल होत आहेत. फाटक, दादा भुसे यांच्या जाण्याने शिवसेनेला धक्का मानला जात आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना मुंबईत आणण्यााठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या रविंद्र फाटक यांना सूरतला पाठवले होते. ते फाटकच आता गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहेत. माजी वनमंत्री संजय राठोड हे सूरतला पोचले आहेत. थोड्याच वेळात दादा भुसे आणि रवींद्र फाटक सूरतला पोचणार आहेत. तेथून ते गुवाहटीला जाणार आहेत. या तिघांसाठी सूरतमध्ये चार्टर्ड प्लेन तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. आज रात्रीपर्यंत ते गुवाहटीला पोचणार आहेत. शिवसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.

रवींद्र फाटक हे विधान परिषदेचे आमदार आहेत. पण, एकनाथ शिंदे यांनी बंड करून सूरतला गेल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांना आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक या दोघांवरच जबाबदारी दिली होती. ज्या व्यक्तीला शिंदे यांना आणण्यची जबाबदारी दिली होती. तीच व्यक्ती एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाली आहे.

एकीकडे शिवसेनेकडून आमदारांना परत बोलविण्याचे प्रयत्न होत आहेत, दुसरीकडे एक एक आमदार शिंदे यांच्या गोटात दाखल होत आहेत. रवींद्र फाटक हे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आहे. एकनाथ शिंदे यांच्या राजकीय वाटचालीचे फाटक हे सहकारी आहेत. ठाण्यात फाटक हे शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय आहेत. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का आहे. हा महाविकास आघाडी सरकारला धक्का नाही, तर आगामी ठाणे महापालिका निवडणुका लढविणेसुद्धा शिवसेला अडचणीचे ठरणारे आहे. शिवसेनेचे आणखी चार ते पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT