धूसफूस वाढली : अजित पवार काँग्रेसच्या आमदारांनाही त्रास द्यायचे : पटोलेंनी तोफ डागली

महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारावर अस्तित्वात आलेले आहे. सरकारने जनतेसाठी काम करावे, अशी आमची अपेक्षा हेाती.
Ajit Pawar-Nana Patole
Ajit Pawar-Nana PatoleSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आम्हाला त्रास देतात, अशी शिवसेना (Shivsena) आमदारांची तक्रार होती. तीच तक्रार आमच्या आमदारांचीही होती. काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला पैसे न देणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार होत होते, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. (Ajit Pawar was also harassing Congress MLAs: Nana Patole)

प्रदेशाध्यक्ष पटोले हे माध्यमाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरच निशाणा साधला. ते म्हणाले की, पवार हे काँग्रेस आमदारांना त्रास देत होते. त्यांना निधी देत नव्हते. तसेच, काँग्रेस मंत्र्यांच्या विभागाला पैसे न देणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार होत होते. त्यावर माझं असं मत होतं की असे प्रकार चालणार नाहीत. राज्यातील जनतेसाठी हे सरकार असून कोणत्याही गटासाठी ते नाही, असे आम्ही ठामपणे सांगत होतो. हा विरोध राजकीय नव्हता, तर जनतेसाठी होता.

Ajit Pawar-Nana Patole
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थिती लावत खासदार श्रीरंग बारणेंनी जपली ठाकरेनिष्ठा!

महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आधारावर अस्तित्वात आलेले आहे. सरकारने जनतेसाठी काम करावे, अशी आमची अपेक्षा हेाती. त्यातून आम्ही बोलत होतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविषयी आमची काही तक्रार नव्हती. आमचा व्यवस्थित समन्वय होता. त्यांच्या पक्षातील विषय आम्हाला माहीत नव्हता. मात्र, शिवसेनेतील बंडखोरीमागे ईडी आहे. कारण, त्या माध्यमातून विरोधातील लोकांना भीती दाखवले जात आहे. भारतीय जनता पक्षाचा हा खेळ आहे, असा आरोपही पटोले यांनी भाजपवर केला.

Ajit Pawar-Nana Patole
राष्ट्रवादीने केली विरोधात बसण्याची तयारी!

मुद्दा हिंदुत्वाचा नाही तर ईडी आणि सीबीआयच्या त्रासाचा आहे. हा फक्त ईडीचा खेळ आहे. हे सर्वांना माहीती आहे. भाजपचा हा खेळ सर्व जनता जाणून आहे. भाजप सत्तेसाठी किती खाली जाऊ शकतो, हे एकदा देशाला बघू द्या, असेही नाना पटोले म्हणाले.

Ajit Pawar-Nana Patole
भाजपची मोठी ऑफर : एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, तर श्रीकांत शिंदे केंद्रात मंत्री?

भारतीय जनता पक्ष या बंडखोरीबद्दल का बोलत नाही. महाविकास आघाडी सरकार आजही मजूबत आहे. काँग्रेस संपूर्ण ताकदीने उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहे. काँग्रेसमधील सर्व आमदार सुरक्षित आहे. आम्हाला सत्तेची लालचा नाही. आम्हाला जनतेने विरोधात बसण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधातही बसायला तयार आहे. पण, आज तरी आम्ही महाविकास आघाडीसोबत प्रामाणिकपणे राहायला तयार आहोत, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com