Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut News: संजय राऊतांवर पुन्हा 50 आमदार आणणार हक्कभंग

सरकारनामा ब्यूरो

Political News: खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 50 आमदार संजय राऊतांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र, यावरूनच आता शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर हक्कभंग दाखल करण्याची मागणी केली आहे.

संजय शिरसाट यांनी याबाबतचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना लिहिलं आहे. विधानसभा अध्यक्ष हे विधानसभेचे पीठासीन अधिकारी आहेत. त्यामुळे अशा घटनात्मक पदावरील व्यक्तीविरोधात खालच्या पातळीवर टीका करणं योग्य नसल्याचं शिरसाटांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे संजय शिरसाट यांनी दाखल केला आहे. राऊत हे विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारावर गदा आणत आहेत, असं माध्यमांशी बोलताना शिरसाटांनी म्हटलं आहे.

शिरसाट म्हणाले, "संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अनेक वादग्रस्त वक्तव्यं केले आहेत. विधानसभा अध्यक्ष आमच्याकडेच वकिली करत होते. त्यांना यातलं काहीही कळत नाही. त्यांनी चुकीचा निर्णय दिला तर त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी वक्तव्य राऊतांनी केली असल्याचं शिरसाट म्हणाले. त्यामुळे राऊतांच्या या वक्तव्यांमुळे हक्कभंग झाला असल्याचं शिरसाटांनी म्हटलं.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT