MLA Satyajeet Tambe face book post on statue of chhatrapati shivaji maharaj Sarkarnama
मुंबई

Statue Shivaji Maharaj: चौकशीसाठी फक्त दोन दिवस खूप, एसआयटी-फिसायटीची गरजच नाही; सत्यजीत तांबे संतापले

सरकारनामा ब्यूरो

मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर शिवप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. 4 डिसेंबर 2023 रोजी मालवणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आले होते. कोट्यवधींचा खर्च करुन बांधलेला हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांत कोसळला. या घटनेनंतर, आमदार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांची फेसबूक पोस्ट सोशल मिडियावर चर्चेत आहे.

ऊन, वारा, पाऊस यासोबतच परकीयांचे आक्रमण व तोफांचा मारा झेलूनही छत्रपती शिवरायांचे गड-किल्ले गेल्या चारशे वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. सरकारने उभारलेला शिवरायांचा पुतळा मात्र एक वर्षही तग धरू शकला नाही हे फार मोठं दुर्दैव आहे, अशी खंत आमदार तांबे यांनी व्यक्त केली आहे.

या घटना पाहता जागतिक महासत्ता होण्याचे स्वप्न पाहणारा आपला देश नागरिकांसाठी दर्जेदार प्राथमिक सुविधाही उभारू शकत नाही हे सत्य लपून राहत नाही. सरकार कोणाचेही असो भ्रष्टाचारामुळे "स्वाभिमान" मात्र संपूर्ण महाराष्ट्राचा जमीनदोस्त होत आहे, असे तांबे यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे.

बदलापूरच्या घटनेतील दोषींइतकीच कडक शिक्षा मालवणच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम करणारे ठेकेदार, त्यांच्या निविदा प्रक्रियेवर ज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत ते सर्व अधिकारी, त्या ठेकेदाराचे बिल काढणारे सर्व अधिकारी या सगळ्यांवर झाली पाहिजे. ही सगळी चौकशी करण्यासाठी फक्त दोन दिवस खूप होतील, व एसआयटी- फिसायटी ची गरजच नाही, अशा शब्दात तांबेंनी प्रशासनावा खडेबोल सुनावले आहे.

गावोगावच्या विकासकामांमध्ये होणारा भ्रष्टाचार, आपल्या मर्जीच्या ठेकेदारांना लाभ मिळवून देण्यासाठी राजकीय लोकांकडून होणारे गैरप्रकार यामुळे घडणाऱ्या घटना आपण बघतच आहोत..., अशी खंत तांबे यांनी व्यक्त केली आहे.

या प्रकरणी रात्री उशिरा मालवण पोलिस ठाण्यात शिल्पकार आणि कन्सल्टंट या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT