Yamini Jadhav News, Geeta Jain News, Eknath Shinde latest News
Yamini Jadhav News, Geeta Jain News, Eknath Shinde latest News Sarkarnama
मुंबई

'मातोश्री'साठी दुसरा धक्का : आमदार यामिनी यशवंत जाधव सुरतला पोहोचल्या...

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

सुरत : शिवसेनेची बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतुनच (Shivsena) पाठिंबा वाढत आहे. तब्बल ३५ आमदारांसह सुरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत आता मातोश्रीच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या आमदार यामिनी यशवंत जाधव आणि आमदार गीता जैन या देखील दाखल झाले आहेत. दुपारी शिवसेनेच्या झालेल्या बैठकीला यामिनी जाधव या आजारपणाचे कारण देवून गैरहजर राहिल्या होत्या. मात्र त्या आता शिवसेनेच्या बंडात सामिल झाल्या आहेत. तर गीता जैन या शिवसेनेच्या समर्थक अपक्ष आमदार आहेत. (Eknath Shinde latest News)

यामिनी जाधव यांच्या पतीच्या मागे ईडी चौकशी :

दरम्यान यामिनी जाधव यांचे पती आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यामागे सध्या ईडीचा समेमिरा लागला आहे. यापूर्वी ईडी आणि आयकर विभागाकडून त्यांची अनेकदा कसून चौकशी करण्यात आली असून त्यांच्यावर अटकेचीही टांगती तलवार आहे.

जाधव यांच्या घरी तपासादरम्यान ईडीला एका डायरीमध्ये मातोश्रीशी संबंधित काही नोंदी सापडल्या होत्या. यशवंत जाधव हे मागील अनेक वर्षांपासून महत्वाच्या पदावर असून ते ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे नेते समजले जातात. त्यामुळे यामिनी जाधव यांच्या बंडातील सहभाग हा मातोश्रीला मोठा धक्का मानला जातो. तसेच ईडीच्या भीतीने शिंदे यांच्या बंडात सहभागी झाल्या का असा सवाल विचारला जात आहे.

याशिवाय आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार लता सोनावणे या देखील सुरतमध्येच असल्याचे समोर आले आहे. आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला शिवसेनेचे केवळ १८ आमदार उपस्थित असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह तब्बल ३५ आमदार असल्याचे समोर आले आहे.

कोण होते बैठकीत उपस्थित?

आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह बैठकीला आमदार वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रविंद्र वायकर, गुलाबराव पाटील, दादा भुसे, मंगेश कुडाळकर, संजय राठोड, प्रकाश फातरपेकर, राहुल पाटील, सुनिल प्रभू, दिलीप लांडे, उदय सामंत, राजन साळवी, योगेश कदम, सदा सरवणकर, अजय चौधरी, प्रकाश आबिटकर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT