Eknath Shinde |  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात; बच्चू कडूंनंतर शिंदे गटाच्या मंत्र्याचाही गौप्यस्फोट

Maharashtra Politics| ठाकरे गट वगळता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

सरकारनामा ब्युरो

Maharashtra Politics : शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे काही आमदार माझ्यासोबत असल्याचा दावा केला होता. त्यांच्यावंतर आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी देखील महाविकास आघाडीचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट केला आहे.

ठाकरे गट वगळता महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाचे किती आमदार फुटतील, हे सध्याच सांगणे शक्य नाही. पण १० ते १२ आमदार फुटणार, हे मात्र नक्की. असा दावा दावा तीन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी केला होता. त्यानंतर आता महाविकास आघाडीचे 20 ते 25 आमदार आमच्या सोबत येणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे कुस्तीच्या कार्यक्रमा दरम्यान सामंतांनी हा दावा केला आहे.

महाविकास आघाडीचे ‌ 20 ते 22 आमदारआमदार लवकरच बाहेर पडतील असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी यापुढे महापालिकेचं मैदान असो लोकसभेचे असो अथवा विधानसभेचे सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस हेच जिंकणार, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या दाव्याबाबत विचारले असता, सामत म्हणाले की, माझ्या संपर्कात आहेत तर 8 ते 10 आमदार आणि बच्चू कडूंच्या असे मिळून 20 ते 22 आमदार आमच्या सोबत असल्याचा दावाही सामंत यांनी केला आहे.

दरम्यान, टेंभूर्णीतील कुस्ती स्पर्धेसाठी पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक मल्ल त्याठिकाणी आले होते. तर या स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजारांहूनअधिक लोकांनी गर्दी केली होती. पण सामंतांचे भाषण सुरू होताच उपस्थितांनी 'वीज तोडणीवर बोला' अशी घोषणाबाजी करत गोंधळ सुरू केला. यावेळी पुरेशा दाबाने वीज पुरवठा करण्याचे आश्वासनही सामंत यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT