BJP News; भाजपचे टार्गेट ठरले... उद्धव ठाकरेंची शिवसेना!

भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचाही शंखनाद केला.
Devendra Fadanvis & Uddhav Thackrey
Devendra Fadanvis & Uddhav ThackreySarkarnama

डॉ. राहुल रनाळकर

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) महाराष्ट्र (Maharashtra) प्रदेश कार्यकारिणीची बैठक नाशिकमध्ये (Nashik) पार पडली. या बैठकीनिमित्त भाजपने राज्यातील लोकसभा, विधानसभेबरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Elections) निवडणुकांचाही शंखनाद केला. यावेळी झालेल्या विचारमंथनामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) हेच पक्षाचे टार्गेट असेल हे स्पष्ट झाले. (Uddhav Balasaheb Thackrey will be the target for BJP in Local elections)

Devendra Fadanvis & Uddhav Thackrey
Sambhajiraje Chhatrapati : 'आता बस्स झालं..' म्हणत संभाजीराजेंनी दंड थोपटले ; महाराष्ट्रात राजकीय गणितं बदलणार..

जानेवारीत `भाजप`ची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यानंतर नाशिकमध्ये प्रदेश कार्यकारीणीची दोनदिवसीय बैठक झाली. आता पुढे जिल्हा व तालुकानिहाय संघटनात्मक निवडणुकांचे नियोजन होईल. या माध्यमातून भाजप आपला अजेंडा मतदारांपर्यंत पोचविणार आहे.

Devendra Fadanvis & Uddhav Thackrey
BJP State Meeting; आघाडी सरकारने फडणवीसांच्या अटकेची तयारी केली होती.

या बैठकीत पारित करण्यात आलेल्या ठरावांमधून राजकीय अजिंठा फिक्स करण्याचे उद्दिष्ट असल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने पक्षाकडून काही मुद्देही मांडण्यात आले. विशेषकरून कृषी व राजकीय ठरावांच्या माध्यमातून भाजपने निवडणुकीचा शंखनाद केला आहे. निवडणुकांचा शंखनाद करताना ठोस अशी विकासकामे सांगण्यासारखी नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार व महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करण्याचे धोरण अधिक असल्याचे दिसून येत आहे. शिंदे व फडणवीस सरकारने अमलात आणलेली योजना मतदारांपर्यंत पोचवताना ही योजना उद्धव ठाकरे यांनी कशी मोडकळीस आणली किंवा त्या योजनेला कशी स्थगिती दिली, यावर बैठकीत अधिक भर देण्यात आल्याचे दिसून आले.

लोकांपर्यंत ही बाब पोचविताना उद्धव ठाकरे यांनाच टार्गेट करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या कृषी योजना अमलात आणल्याचे सांगताना त्या योजना उद्धव ठाकरे यांनी कशा मोडकळीस आणल्या, हे आधी सांगितले जात आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाणारे उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी शेतकऱ्यांवर कसा अन्याय केला, याचा पाढा वाचला जात आहे. केंद्र सरकारने अर्थसंकल्पात दहा हजार कोटी रुपये करमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे, त्याचे भांडवल करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आतापर्यंत असलेल्या व्होट बॅंकेपर्यंत पोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सहकारातील मक्तेदारी मोडून काढण्याचेही नियोजन करताना सोसायटी, साखर कारखाने आदी सहकार निवडणुकांमध्ये पाय रोवण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.

Devendra Fadanvis & Uddhav Thackrey
BJP News; नाशिकच्या विकासकामांच्या ‘क्रेडिट’ वर बोळा?

वेदांत फॉक्सकॉन लागला जिव्हारी

गुजरात निवडणुकांपूर्वी महाराष्ट्रातून वेदांत फॉक्स्वान प्रकल्प गुजरातला गेल्याने शिंदे फडणवीस सरकारला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. ही टीका जिव्हारी लागल्याचे पडसाद बैठकीत दिसून आले. एकीकडे उद्धव ठाकरे यांना टार्गेट करताना दुसरीकडे भाजप सरकारच्या काळात औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र कसा आघाडीवर आहे, हे दाखवण्याची धडपड आगामी काळात राहील, असे ठरावातून दिते.

वेदांता फॉक्सकॉनचा नकारात्मक प्रचार लोकांच्या मनातून काढून टाकण्यासाठी एक लाख ३७ हजार कोटींची गुंतवणूक झाल्याचे दावे- प्रतिदावे केले जात आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात प्रगतिपथावर असल्याचे कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबविण्यात आले. एकूणच भारतीय जनता पक्षाच्या प्रादेशिक बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना पक्ष संघटना बळकटीसाठी वैचारिक धन मिळण्याऐवजी प्रत्येक पदाधिकारी सरकार टिकून ठेवण्यासाठी प्रचारकाच्या भूमिकेत येणार हे स्पष्ट झाले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com