soniya gandhi mallikarjun kharge rahul gandhi nana patole sarkarnama
मुंबई

Mlc Election 2024 : गद्दारांना क्षमा नाही, फुटीर आमदारांबाबत काँग्रेसच्या हायकमांडचे मोठे आदेश

Akshay Sabale

लोकसभेला मुसंडी मारलेल्या महाविकास आघाडीला विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं धक्का दिला. महाविकास आघाडीनं तिसरा उमेदवार उतरवून 'रिस्क' घेतली होती. पण, 2022 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेही 'फडणवीस पॅटर्न'ने महाविकास आघाडीची मते फोडली.

यात महायुतीचे 9 उमेदवार निवडून आले. तर महाविकास आघाडीच्या ( Mahavikas Aghadi ) दोनच उमेदवारांचा विजय झाला. शेतकरी कामगार पक्षाचे नेते, जयंत पाटील यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. जयंत पाटील यांना 12 मते पडली आहे. तर, काँग्रेसची 7 ते 8 फुटल्याची चर्चा रंगली आहे. फुटलेल्या मतांमुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचं बोललं जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही 'महाविकास आघाडी'ची मते आम्हाला मिळाली, असं सांगितलं आहे. त्यामुळे फुटीर आमदारांविरोधात कठोर कारवाईचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधान परिषदेच्या निकालानंतर दिले होते. यातच फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश हायकमांडने नाना पटोले यांना दिले आहेत.

2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीवेळी काही आमदारांनी भाजपच्या उमेदवारांना मतदान केलं होतं. त्यामुळे काँग्रेसचे ( Congress ) उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसची मते फुटल्यानं शेकापच्या जयंत पाटील यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे.

फुटीर आमदारांबाबत काँग्रेसकडून 'ट्रॅप' लावण्यात आला होता. त्या 'ट्रॅप'मध्ये आमदार अडकले आहेत. फुटलेल्या आमदारांवर कारवाईसाठी हायकमांडला रिपोर्ट सादर करण्यात आला होता. त्यानंतर फुटलेल्या आमदारांवर कारवाई करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष पटोले यांना देण्यात आले आहेत. आता काँग्रेसच्या चिंतन बैठकीत फुटीर आमदारांवर चर्चा करण्यात येईल. त्यासह त्यांची पक्षातून हकालपट्टीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 'गद्दारांना क्षमा नाही', असा संदेश यामध्यातून काँग्रेस देऊ इच्छित आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT