BJP Latest Marathi News, MLC Latest Marathi News
BJP Latest Marathi News, MLC Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

भाजपला एकच गोष्ट विजय मिळवून देऊ शकते! नेत्यांचा जोर त्यावरच...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधान परिषदेची निवडणूक आता तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. महाविकास आघाडीसह भाजपकडून विजयाचा दावा केला जात आहे. पण प्रत्यक्षात आघाडीच्या तुलनेत भाजपला विजयासाठी खूप झगडावे लागणार असल्याचे सध्याच्या संख्याबळानुसार दिसते. राज्यसभा निवडणूक भाजपने चमत्कार करून दाखवला असला तरी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपला एकच गोष्ट विजय मिळवून देऊ शकते. भाजपच्या नेत्यांकडूनही वारंवार त्याचाच उल्लेख केला जात आहे. (MLC Election 2022 Latest News)

भाजपच्या (BJP) उमेदवारांसह अपक्ष म्हणून सदाभाऊ खोत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला तेव्हा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विजयाचं गणित विचारण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी एक सदसद्विवेकबुध्दी या शब्दाचा उल्लेख केला होता. महाविकास आघाडीतील आमदार सदसद्विवेकबुध्दीला स्मरून मतदान करतील, त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांचा विजय होईल, असं ते म्हणाले होते.

आता निवडणूक तीन दिवसांवर आली आहे. पण त्यानंतर भाजप नेत्यांकडून सदसद्विवेकबुध्दीचाच आधार घेतला जात आहे. गुरूवारी भाजपच्या बैठकीनंतर बोलताना आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सर्व आमदार सदसद्विवेकबुद्धी स्मरून भाजपाला पुन्हा मतदान करतील, असं सांगितलं. विधान परिषद निवडणुका अंतिम टप्प्यात आल्या आहेत. हा निकाल भाजपाच्या बाजूने लागेल, असं शेलार म्हणाले. रणनीती आखताना योग्य आणि सावध पावले टाकतोय, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.

राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला जेमतेम दहा मतांची गरज होती. पण विधान परिषदेच्या निवडणुकीत पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी 20 हून अधिक मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेला मदत केलेले छोटे पक्ष व अपक्षांनी पुन्हा मतदान केले तर हा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे भाजपला आघाडीतील आमदाराचं फोडावे लागतील. त्यामुळेच भाजप नेत्यांकडून सातत्याने सदसद्विवेकबुद्धीची आठवण करून दिली जात असल्याची चर्चा आहे.

सर्व सहकारी सोबत काम करतोय. राज्यसभेत महा विकास आघाडीतील आमदारांनी छातीवर हात ठेवून मत दिले नाही, हे सांगायचे धाडस करणार नाही. अपक्षच नव्हे तर महा विकास आघाडीचे आमदारही मदत करतील, असंही शेलार यांनी यावेळी बोलताना ठामपणे सांगितले. संजय राऊत मित्र पक्षांच्या आमदारांना घोडेबाजार बोलले. शिवसेनेतच अंतर्गत धुसफूस आहे. - महा विकास आघाडीत विचका झालेला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT