काश्मिरी पंडितांचा नरसंहार आणि मॉब लिंचिंग...! सुपरस्टार साई पल्लवीनं आगीत तेल ओतलं

तिनं काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिंचिंगची तुलना केल्यानं वाद निर्माण झाला आहे.
Actress Sai Pallavi Latest Marathi News
Actress Sai Pallavi Latest Marathi NewsSarkarnama

नवी दिल्ली : वादग्रस्त मुद्दांपासून नेहमीच दूर राहणारी दक्षिणेतील सुपरस्टार साई पल्लवी नव्या वादात अडकली आहे. तिनं काश्मिरी पंडितांची हत्या आणि मॉब लिंचिंगची तुलना केल्यानं हा वाद निर्माण झाला आहे. वाहनामध्ये गायींना घेऊन जाणाऱ्या मुस्लिमावर हल्ला करून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्याची घटना घडली होती. धार्मिक वादाचा मुद्दा घेतल्यास ही घटना आणि काश्मिरी पंडितांच्या हत्येमध्ये फरक कुठे आहे, असं साई पल्लवी म्हणाली आहे. (Superstar Sai Pallavi Latest Marathi News)

द काश्मीर फाईल्स या चित्रपटावरून बराच वाद निर्माण झाला होता. साई पल्लवीच्या या वक्तव्याने आता या वादात आणखी भर पडली आहे. साई पल्लवी ही सध्या तिच्या ‘Virata Parvam’ या तेलगू चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. हा चित्रपट नक्षलवादाशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे.

एका युट्युब चॅनेलला मुलाखत देताना आपल्या राजकीय भूमिकेविषयी बोलताना ती म्हणाली, मी कोणत्याही विचारधारेशी न जोडलेल्या तटस्थ कुटुंबात जन्मली आहे. गरजूंना मदत करणे मला शिकवले आहे. त्यांना आधार द्यायला हवा.

Actress Sai Pallavi Latest Marathi News
मलिकांसह जैन यांचं मंत्रिपदही जाणार? भाजप नेत्याची सर्वोच्च न्यायालयात धाव

डाव्या आणि उजव्या विचारसरणीबद्दल खूप ऐकले असल्याचे सांगत ती म्हणाली, कोणती विचारसरणी बरोबर आणि कोणती चूक यावर मी बोलणार नाही. द काश्मीर फाईल्स या चित्रपटात काश्मिरी पंडितांचा नरसंहार दाखवण्यात आला आहे. त्यावेळी जे तिथं जो अत्याचार झाला तो दाखवला आहे. पण काही वर्षांपूर्वी वाहनात गायींना घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम चालकाला मारण्यात आले होते. त्यानंतर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या.

ही धर्माच्या नावावर झालेलीच हत्या होती. पण या दोन घटनांमध्ये काय फरक आहे, असा सवाल करत साई पल्लवी हिने दोन्ही घटना सारख्याच असल्याचं वक्तव्य केलं आहे. याच वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे.

अनेकांनी साई पल्लवीवर सडकून टीका केली असून वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली आहे. तर काँग्रेससह अन्य काही पक्षांच्या नेत्यांनी साईनं धाडसी वक्तव्य केल्याचे सांगत तिचं कौतूकही केलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com