MLC Election | Dnyaneshwar Mhatre  Sarkarnama
मुंबई

Konkan MLC Election Result: विजयानंतर ज्ञानेश्वर म्हात्रे आहेत कुठे?

Dnyaneshwar Mhatre : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजय मिळवला.

सरकारनामा ब्युरो

Graduate Constituency Election : राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल लागले आहेत. विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे दणदणीत विजय मिळवला.

महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील (Balaram Patil) यांचा मोठ्या फरकाने म्हांत्रेंनी पराभव केला. या विजयानंतर नवनिर्वाचित आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट यांची भेट घेतली. या भेटीचे फोटो आता व्हायरल होऊ लागले आहेत.

एकनाथ शिंदे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देत म्हात्रेंनी त्यांचे आभार मानले. तसेच, 'हा माझा एकट्याचा विजय नसून माझ्या मतदारसंघातील सर्व शिक्षकांचा विजय आहे. मी गेल्या सहा वर्षांमध्ये जे काम केलं त्याची पोचपावती मला माझ्या मतदारसंघातील शिक्षकांनी दिली आहे. 33 संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री आणि पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो' अशा भावना म्हात्रेंनी यावेळी व्यक्त केल्या.

दरम्यान, कोकणात पदवीधर मतदारसंघात एकूण ९१.०२ टक्के मतदान झाले होते. यात आता कोकणात भाजप (BJP) चे ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) यांना २० हजार ८०० मते मिळाली आहेत. तर बाळाराम पाटील यांना अवघ्या ९ हजार ५०० मतांवर समाधान मानावे लागले. याठिकाणी गेल्या वेळेपेक्षा अधिक मतदान झाले होते. त्याचा फायदा म्हात्रे यांना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या निवडणुकीत ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी ६ हजारांहून अधिक मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे भाजपने त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली होती. मागील निवडणुकीतही म्हात्रे यांनी मतदार संघ पिंजून काढला होता. त्याचा त्यांना यावेळी मोठा फायदा झाला.

ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवभक्त विद्यामंदीर शाळेचे संचालक असून येथे मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत. यासह अंबरनाथ तालुक्यातील सिंड्रेला इंग्लिश स्कुल, शंभूराजे प्राथमिक विद्यामंदीर, एम. के. पाटील विद्यामंदीर या शाळांमध्ये ते संचालक आहेत. त्यामुळे शिक्षकांमध्ये त्यांची संबंध चांगले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT