Marathwada Teacher Constituency Analysis : नाराजी तरीही मतदार नोंदणी, अन् शिक्षकांशी असलेल्या भावनिक नात्याने काळे तरले..

Vikram Kale : पुढच्या निवडणुकीत मतदार बदलाच्या तयारीत असल्याचे संकेत या निवडणुकीतून दिले आहेत.
Marathwada Teacher Constituency Analysis, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Analysis, AurangabadSarkarnama

Aurangabad News: औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) अखेर विजयी झाले. निवडणुकीत चौथ्यांदा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला, पण सुरुवातीपासून त्यांना ग्रहण लागले होते. पक्षातील राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप सोळुंके यांनी बंडखोरी केली आणि `बाप्पा`, (काळे) ची डोकेदुखी वाढवली. अर्थात त्याचा तसुभरही फरक मतदानावर पडला नाही.

Marathwada Teacher Constituency Analysis, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Result : महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौथ्यांदा विधान परिषदेवर ; भाजप पुन्हा पराभूत..

दुसरीकडे (Bjp) भाजपने आयत केलेले किरण पाटील यांना पक्षात घेवून उमेदवारी जाहीर केली. त्यांना रसद पुरवली, नेत्यांनी दौरे केले, पण त्यांच्यावर शिक्षक मतदारांनी विश्वास दाखवला नाही. तिसरीकडे मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सुर्यकांत विश्वासराव यांनी अनपेक्षितपणे मत मिळवली. (Ncp) काळे यांच्या विरोधात नाराज असलेल्यांची ही मते होती हे आता स्पष्ट झाले आहे.

अशा चोहोबाजूंनी घेरले गेलेले असतांना देखील विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजयाला गवसणी घातली ही काही सोपी गोष्ट नाही. राष्ट्रवादी व काॅंग्रेसच्या ताब्यात असलेल्या शिक्षण संस्था हेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे बलस्थान राहिले आहे. या शिवाय मतदार नोंदणीत कायम आघाडीत राहिल्यामुळे जितकी नोंदणी तितकी विजयाची खात्री हे धोरण यावेळीही काळे यांना लागू पडले.

तिसरा महत्वाच मुद्दा म्हणजे काळे हे तीन टर्मपासून शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करत असल्याने त्यांचे शिक्षक कुटुंबाशी जुळलेले भावनिक नाते. याचा देखील काळेंना या निवडणुकीत फायदा झाला. मतदारसंघात दौऱ्यावर असतांना आपण कधीच हाॅटेलमध्ये जेवत नाही, तर माझ्या शिक्षकांच्या घरी पुरणपोळीचे गोड जेवण घेतो असे जाहीर सभांमधून सांगत काळे यांनी यावेळी शिक्षक मतदारांना भावनिक नात्याची आठवण देखील करून दिली होती.

सभागृहात शिक्षकांचे प्रश्न रेटत ते सोडवण्यासाठी केलेली मेहनत मतदार गेल्या तीन टर्म पासून पहात आला आहे. यापैकी किती प्रश्न सुटले आणि किती प्रलंबित आहे? हा वादाचा मुद्दा असला तरी काळेंचे प्रामाणिक प्रयत्न यावर मतदारांनी पुन्हा विश्वास टाकला. काळे यांनी काल पहिल्या पसंतीत विजय न मिळाल्याबद्दल खंत बोलून दाखवली होती. दुसऱ्या पंसतीत विजय मिळणार हे निश्चित असूनही त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता.

Marathwada Teacher Constituency Analysis, Aurangabad
AAP News : चिंचवड पोटनिवडणुकीत 'आप'ने ठोकला शड्डू,दोन दिवसांत उमेदवार जाहीर करणार

यामागचे कारण म्हणजे त्यांच्या विरोधात नाराजी मोठ्या प्रमाणात असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. त्यांची नाराजी किरण पाटील किंवा विश्वासराव या दोघांपैकी कुण्या ऐकाकडे अधिक प्रमाणात मतांच्या रुपाने परिवर्तीत झाली असती तर कदाचित निकाल वेगळा लागला असता. पण या नाराजीची विभागणी दोन ठिकाणी झाली आणि काळेंचा विजय सत्यात उतरला.

भाजपच्या मतांचे प्रमाण नवख्या आणि आयात केलेल्या किरण पाटलांना उमेदवारी देवून देखील वाढली त्यामागे सभागृहात छातीठोकपणे जुनी पेन्शन योजना लागू होणार नाही हे सांगणाऱ्या फडणवीसांनी मतांसाठी हे फक्त आम्हीच करू शकतो हे सांगितल्यामुळेच. पण महिनाभरात भाजपच्या भूमिकेत बदल आणि या संदर्भात ते निर्णय घेतील यावर मतदारांचा विश्वास बसला नाही. परिणामी मतांचे प्रमाण वाढून देखील भाजपला विजय काही साध्य करता आला नाही.

Marathwada Teacher Constituency Analysis, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Result : अडीच हजार मतं बाद, गुरुजींनी केली उमेदवारांची `शाळा`..

मराठवाडा शिक्षक संघटनांनी मजबुतपणे विश्वासरावांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना मतदान देखील केले. पण त्यांचे प्रयत्न विक्रम काळेंना रोखण्यात कमी पडले. एकंदरति शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीने विजयी आणि पराभूत अशा दोन्ही पक्षांना एक संदेश दिला आहे.

शिक्षकांच्या मागण्या अन् प्रश्न सोडवण्यात यावेळी अपयश आले, तर पुढच्या निवडणुकीत मतदार बदलाच्या तयारीत असल्याचे संकेत या निवडणुकीतून दिले आहेत. त्यामुळे काळे यांना मिळालेल्या चौथ्या संधीचे सोने करून शिक्षकांच्या रखडलेल्या मागण्या सरकार कुणाचेही असले तरी मंजुर करून घेतील ही अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com