Eknath Khadse and Ramraje Nimbalkar Latest Marathi News
Eknath Khadse and Ramraje Nimbalkar Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

रामराजेंकडे 25 हजारांची जीप तर खडसेंकडं वाहनच नाही! राम शिंदे पाच कोटींचे मालक

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांची एकूण संपत्ती सुमारे 26 कोटी 75 लाख रुपये एवढी आहे. पण तरीही त्यांच्याकडे एकही महागडे वाहन नसून 25 हजार रुपयांची जीव त्यांच्या नावावर आहे. राष्ट्रवादी दुसरे उमेदवार एकनाथ खडसे कुटुंबीय 35 कोटींच्या संपत्तीचे मालक असले तरी त्यांच्या नावावर एकही वाहन नाही. (Eknath Khadse Latest Marathi News)

विधान परिषद निवडणुकीसाठी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी ही माहिती दिली आहे रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे 68 लाख 35 हजारांची आणि पत्नीच्या नावे 58 लाख 7 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामध्ये सुमारे 61 लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आहेत. तर अनुक्रमे 25 कोटी 35 लाख आणि 8 कोटी 19 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

एकनाथ खडसे यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या नावे अधिक संपत्ती आहे. खडसे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे 35 कोटी एवढी आहे. त्यामध्ये खडसे यांच्याकडे 38 लाख 41 हजारांची तर पत्नीकडे 2 कोटींची जगंम मालमत्ता आहे. हिंदू अविभक्त कुटुंबाची जंगम मालमत्ता दोन कोटी 83 लाखांची आहे. त्यामध्ये 37 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. खडसेंच्या पत्नीच्या नावे तब्बल 20 कोटी 22 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. हिंदू अविभक्त कुटुंबाची मालमत्ता सुमारे 10 कोटी तर खडसेंच्या नावार 72 लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

राम शिंदे सव्वा पाच कोटींचे मालक

भाजपचे उमेदवार राम शिंदे यांच्याकडे सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांची संपती आहे. त्यांची जंगम मालमत्ता 1 कोटी 80 लाख रुपयांची असून त्यात साडे नऊ लाख रुपयांचे 19 तोळे सोने आहे. त्यांच्या नावे 1 कोटी 31 लाख तर पत्नीच्या नावे 2 कोटी चार लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच दोन कोटी रुपये कर्जही आहे.

खापरे कुटुंबाकडे चार कोटींची संपत्ती

भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या उमा खापरे यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे चार कोटींची आहे. त्यामध्ये त्यांच्या नावे एक कोटी तर पतीच्या नावे 2 कोटी 30 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तसेच सुमारे 63 लाखांची जंगम मालमत्ता असून त्यात तीन लाखांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT