प्रसाद लाड यांच्या संपत्तीत 58 कोटींची घट तरीही सर्वात श्रीमंत उमेदवार

प्रसाद लाड हे विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आहेत.
Prasad Lad Latest Marathi News, Prasad Lad Net worth
Prasad Lad Latest Marathi News, Prasad Lad Net worthSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांच्या संपत्तीत सहा वर्षांत सुमारे 58 कोटींनी घट झाली आहे. पण तरीही ते सध्याच्या उमेदवारांमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये 152 कोटींची संपत्ती जाहीर केली आहे. मागील निवडणुकीवेळी त्यांनी 210 कोटींची संपत्ती असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. (BJP Prasad Lad Latest Marathi News)

प्रसाद लाड यांची जंगम मालमत्ता 32 कोटी 59 लाख तर पत्नीची 54 कोटी 65 लाख आणि हिंदू अविभक्त कुटुंबाची 74 लाखांची संपत्ती आहे. त्यामध्ये दोन हजार 24 ग्रॅम सोने, हिरे, चांदी, 12 महागड्या घडाळ्यांचाही समावेश आहे. लाड कुटुंबाची स्थावर मालमता 64 कोटी 46 लाखांची आहे. त्यामध्ये प्रसाद लाड यांच्या नावावरील मालमत्ता 30 कोटी 91 लाखांची आहे.

Prasad Lad Latest Marathi News, Prasad Lad Net worth
राजकीय घडामोडींना वेग; काँग्रेस अन् सदाभाऊही माघार घेणार? आज फैसला

लाड यांच्या पत्नीच्या नावे 29 कोटी 15 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. घरे, व्यापारी गाळे व जमिनींचा त्यामध्ये समावेश आहे. लाड कुटुंबाची 78 कोटी 36 लाख रुपयांची देणी आहेत. लाड हे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेसह क्रिस्टल कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी नीता या आठ कंपन्यांमध्ये संचालक आहेत. इतर उमेदवार प्रसाद लाड यांच्या संपत्तीच्या जवळपासही नाहीत.

Prasad Lad Latest Marathi News, Prasad Lad Net worth
मोठी घडामोड : राष्ट्रपतीपदासाठी 'आप'चा शरद पवारांना पाठिंबा? 'युपीए'ची मोर्चेबांधणी सुरू

दरम्यान, भाजपने प्रसाद लाड यांच्यासह प्रविण दरेकर, राम शिंदे, उमा कापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी दिली आहे. तर सदाभाऊ खोत यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला असून त्यांना भाजपने पुरस्कृत केले आहे. आज उमेदवारी अर्ज घेण्याचा अखेरचा दिवस आहे. विधान परिषदेच्या दहा जागा असून 12 उमेदवार रिंगणात आहेत. येत्या 20 जून रोजी मतदान होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com