pankaja munde sarkarnama
मुंबई

Pankaja Munde Win : पाच वर्षांनंतर पंकजा मुंडेंना लागला गुलाल; विधान परिषदेत दणदणीत विजय

Pankaja Munde : लोकसभेच्या बीड मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी जोर धरत होती.

Jagdish Pansare

विधान परिषदेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. भाजपच्या पाचही उमेदवारांनी विजय मिळवला असून त्यात पंकजा मुंडे यांचाही समावेश आहे.

पंकजा मुंडे ( Pankaja Munde ) यांना पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली असून भाजपचे योगेश टिळेकर, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे हे ही विजयी झाले आहेत.

लोकसभेच्या बीड मतदारसंघात पराभूत झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करा, अशी मागणी जोर धरत होती. याशिवाय मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधात गेलेला मराठा समाज आणि त्याचा राज्यात भाजपला ( bjp ) बसलेला फटका पाहता पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करून हक्काचे ओबीसी मतदार सांभाळण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.

पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या पहिल्या पसंतीच्या मतांमध्येच कशा निवडून येतील याची आखणी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार पंकजा मुंडे यांच्यासह भाजपचे तीन उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांवर विजयी झाले आहेत.

पंकजा मुंडे यांचा विजय अपेक्षित असल्याने त्यांच्या भगिनी माजी खासदार डॉ. प्रीतम मुंडे व त्यांचे कुटुंबीय, समर्थक विधान भवन परिसरात जमा झाले होते. निवडणुकीचा निकाल समोर येताच समर्थकांनी विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

विधानपरिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली आहेत. 2019 मध्ये परळी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना बराच संघर्ष करावा लागला होता. अखेर पाच वर्षानंतर आज पंकजा मुंडे यांना विजयाचा गुलाल लागला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT