abhijit panse niranjan davkhare
abhijit panse niranjan davkhare sarkarnama
मुंबई

MLC Election 2024 : भाजपच्या मतदारसंघात मनसेनं उतरविला उमेदवार, निरंजन डावखरेंचा पत्ता कट?

Akshay Sabale

Mumbai News, 27 May : लोकसभा संपताच आणि विधानसभेपूर्वी राज्यात विधानपरिषद निवडणुकीची ( Mlc Election 2024 ) घोषणा झाली आहे. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. मुंबईतील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं ( ठाकरे गट ) उमेदवार जाहीर केले आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिंदे गटाचे दीपक सावंत ( Deepak Sawant ) लढण्यास इच्छुक आहेत. यातच 'एनडीए'ला बाहेरून पाठिंबा दिलेल्या मनसेनं भाजपच्या जागेवर उमेदवार जाहीर केला आहे. मनसेकडून अभिजीत पानसे यांना कोकण पदवधीर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पानसे महायुती की मनसेचे उमेदवार, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.

निरंजन डावखरे कोकण पदवीधर मतदारसंघातून ( konkan graduate election ) आमदार आहेत. त्यांची मुदत 7 जुलैला संपणार आहे. त्यामुळे कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे ( Niranjan Davkhare ) यांना तिसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता आहे. यातच भाजपच्या मतदारसंघात मनसेकडून उमेदवार अभिजीत पानसेंना ( Abhijit Panse ) मैदानात उतरविलं आहे. त्यामुळे भाजप निरंजन डावखरेंना थांबण्यास सांगणार की मित्रपक्षांमध्ये लढत होणार, हे आगामी काळात स्पष्ट होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मनसेनं 'एक्स' अकाउंटवर पत्रक पोस्ट करत अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यात लिहिलं, "सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवधीर मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री. अभिजीत पानसे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे."

कोण आहेत अभिजीत पानसे?

अभिजीत पानसे हे प्रसिद्ध सिनेलेखख आणि दिग्दर्शक आहेत. रेगे, ठाकरे चित्रपटांसह रानबाजारसारखी त्यांची वेबसीरीज प्रचंड गाजली होती. शिवसेनेत असताना विद्यार्थी सेनेची धुरा अभिजीत पानसे यांच्या खांद्यावर होती. नंतर आदित्य ठाकरेंच्या लॉन्चिंगसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी युवासेनेची स्थापना केली. त्यामुळे नाराज झालेल्या पानसे यांनी शिवसेनेची साथ सोडत मनसेत प्रवेश केला. चित्रपटांव्यतिरिक्त पानसे राजकारणातही सक्रिय असतात. 2014 मध्ये पानसे यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मनसेच्या चित्रपटसेनेची जबाबदारी पानसे यांच्या खांद्यावर आहे. राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात.

डावखरेंना तिकीट मिळणार?

निरंजन डावखरे हे राष्ट्रवादीचे नेते वसंत डावखेरे यांचे सुपुत्र आहेत. 2012 मध्ये निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोकण पदवीधर मतदासंघातून विधानपरिदेवर निवडून गेले होते. 2018 च्या विधानपरिषद निवडणुपूर्वी निरंजन डावखरेंनी राष्ट्रवादी सोडत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर लगेचच त्यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून तिकीट जाहीर झाले होते. पण, आता भाजपचा मित्रपक्ष असलेल्या मनसेनं कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवार उतरविल्यानं डावखरेंना तिकीट मिळणार की नाही? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT