MNS-BJP Alliance News : Sarkarnama
मुंबई

MNS-BJP Alliance News : 'महायुतीतले सहकारी आमदार राजू पाटील' ; भाजपच्या मंत्र्यांकडून उल्लेख होताच मनसेचा खुलासा...

शर्मिला वाळुंज

Kalyan Dombivali News : भारतीय जनता पार्टीचे नेते, राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मनेसेचे आमदार राजू पाटील यांचा उल्लेख करताना महायुतीचे आमचे सहकारी असा केला. यामुळे महायुतीत मनसेच्या समावेशाबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिले. यावर आता आमदार पाटलांनी खुलासा करत युतीचा हा दोन पक्षांचा विषय आहे. तो मी किंवा मंत्री चव्हाण ठरवू शकणार नाही, असे पाटील म्हणाले. (Latets Marathi News)

एका जाहीर कार्यक्रमात मंत्री रवींद्र चव्हाण, शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मनसेचे आमदार राजू पाटील एकाच व्यासपीठीवर उपस्थित होते. यावेळी चव्हाण यांनी आमदार पाटलांचा उल्लेख महायुतील सहकारी असा केला. यामुळे मनसेचा समावेश महायुतीत झाल्याची एकच चर्चा सुरु झाली. यावर आता पाटील यांनी मात्र असा निर्णय अजूनही झाला नसल्याचे सांगितले आहे.

विकास कामे जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र असतो. कारण शेवटी ते सरकारमध्ये आहेत. मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी आहे. मी केलेल्या विनंतीला किंवा मी केलेल्या पाठपुराव्याला त्यांनी निधी दिल्यावर अर्थातच तेही लोक उपस्थित राहणार तिथे मीही असणार आहे. त्यामुळे त्यात वेगळ्या दृष्टीने बघण्याचा काही कारण नाही. राहिला विषय पक्षाचे हे जे काही धोरण आहे ते धोरण राज ठाकरे ठरवतात. ना ते रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) ठरवतात ना मी ठरवू शकत. या गोष्टी वरिष्ठ लेव्हलला जातात. मला वाटतं तेही त्याच अर्थाने बोलले. काही गोष्टी आमच्या वरिष्ठ ठरवतील. परंतु इथे स्थानिक पातळीवर आम्ही नक्की एकमेकांसोबत असतो हे मान्य करायला काही हरकत नाही असे सांगितले.

पुढे ते म्हणाले, '14 गावांचा नवी मुंबई महापालिकेत (BMC) समावेश झाला आहे त्याचा आनंद साजरा करण्यासाठी. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे मी मागणी केली होती, की माझ्या मतदारसंघातील काही रस्ते जे झेडपीच्या अखत्यारित येतात किंवा त्यांच्या खात्यात येतात. त्यांची दर्जोनती करून पीडब्ल्यूडी मधून त्यांना निधी देण्यात यावा. कारण या संस्थांमधून ती कामे होत नव्हती.'

माझ्या विनंतीला मात देऊन त्यांनी माझ्या मतदारसंघातील बरेचसे रस्ते अपडेट करून त्यासाठी निधी मंजूर करून दिला. शंभर कोटीच्या आसपास त्यांनी माझ्या मतदारसंघासाठी निधी दिला आहे. भोपर ते कोपर तसेच 14 गावातील रस्ता या दोन रस्त्यांचा त्यात समावेश असून त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होता. विकास कामे जेव्हा आम्ही करत असतो तेव्हा आम्ही नेहमीच एकत्र असतो,' असेही पाटील म्हणाले.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT