Mumbai News : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक शरद पवार यांच्यावरती भाष्य केले आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या वयातही फिरावे लागते याचे वाईट वाटते, असे वाघ यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. (Latest Marathi News)
चित्रा वाघ यांनी माध्यमांशी संवाद साधला. वाघ म्हणाल्या, "शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना या वयातही फिरावे लागते. हे पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फार वाईट वाटते. त्यांच्याभोवती असणारी फळी कूचकामी ठरली. या वयामध्येसुद्धा नेत्याला मैदानात उतरावे लागते. जिल्ह्या-जिल्ह्यात फिरावे लागते आणि तालुक्यामध्ये लक्ष घालावे लागते, यांसारखे वाईट दुसरे काही नसावे. ज्यांना मोठे केले आणि त्यांच्या अवतीभवती असणारे सर्वच कूचकामी ठरले. एवढ्या मोठ्या ताईंना (सुप्रिया सुळे) त्यांचे राजकीय करिअर सावरायला लागत आहे, अशा शब्दांत वाघ यांनी निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावरती टीका करताना वाघ म्हणाल्या, "ताईंचे मनस्वास्थ्य बिघडले आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्याकडून त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटते. मात्र, अजित पवारांचे प्रचंड कामं आहे, विकासकामांचे प्रचंड व्यासंग असलेले नेते म्हणून अजितदादांची ओळख आहे. विकासकामं आणि दांडगा जनसंपर्क यामुळे सुनेत्रा पवार निवडून येतील असे वाटते."
महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) भाष्य करताना वाघ म्हणाल्या, यांच्याच घराला आग लागली, पण महाविकास आघाडीचे लक्ष भाजपकडे आहे. आमची काळजी करू नका, आमचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस प्रगल्भ आहेत. महाविकास आघाडीचे नेते काही बोलतायत त्यात काही तथ्य नाही. रोज सकाळी यायचं आणि तुतारी वाजवायची असं यांचे काम आहे. शब्दांचे पोकळ बाण सोडणे एवढेच त्यांचे कामं आहे, असे वाघ म्हणाल्या.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.