MNS Raj Thackeray future CM of maharashtra posters viral
MNS Raj Thackeray future CM of maharashtra posters viral  Sarkarnama
मुंबई

MNS News : काय सांगता! राज ठाकरे भावी मुख्यमंत्री ? ; शिवसेना भवनासमोर झळकले बॅनर

अरविंद रेड्डी :सरकारनामा ब्युरो

Mumbai News : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज (बुधवारी) सांयकाळी शिवाजीपार्कवर धडाडणार आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्कवर जमा होण्यास सुरवात झाली आहे.

राज ठाकरेंच्या गुढी पाडव्याच्या सभेनिमित्ताने मनसेने दादर येथील शिवसेना भवनासमोर राज ठाकरेंच्या या सभेचा मोठा फलक लावला आहे. या फलकावर राज ठाकरेंचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून करण्यात आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

या फलकाची चर्चा सध्या समाज माध्यमांवर सुरु आहे. यावरुन चर्चांना उधाण आले आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून राज ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत का? असा प्रश्न या फलकामुळे विचारण्यात येत आहे.

"महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री… हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे… असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे. तसेच हिंदू बांधवांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत. या फलकावर राज ठाकरे यांचा मोठा फोटो आहे. भगवी शाल अंगावर पांघरलेला राज ठाकरे यांचा हा फोटो आहे.

मनसेच्या माहिम विधानसभा शाखेने हे फलक लावले आहेत. मनसेचे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे फलक लावल्याचे दिसते. लक्ष्मण पाटील यांचा फोटो या फलकावर आहे.

राज ठाकरे यांचे घर विविध फुलांनी सजवले असून संपूर्ण परिसर फुलांनी सजविण्यात आला आहे. आज सांयकाळी होत असलेल्या या सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक शिवाजी पार्ककडे येण्यास सुरवात झाली आहे. मनसेचे या सभेचे तीन टीझर प्रदर्शित केले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये मोठे उलटफेर झाले आहेत. त्यातच सत्तासंघर्षाची सुप्रीम कोर्टातली सुनावणीही संपली आहे, ज्याचा निकाल कधीही येऊ शकतो, त्यामुळे राज ठाकरे या संपूर्ण राजकारणाबाबत कोणती भूमिका घेणार आणि खास त्यांच्या शैलीत कोणावर घणाघात करणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

राज्यात झालेला सत्तासंघर्ष, शिवसेनेत पडलेली फूट, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळालेले शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह, सत्ता संघर्षाची पूर्ण झालेली सुनावणी अर्थसंकल्पीय अधिवेशन, महिलांसाठी एसटी प्रवासात ५० टक्के सवलत, आगामी निवडणूका असे अनेक मुद्दे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे यातील कोणत्या मुद्द्यावरुन राज ठाकरे हे सरकारला घेरतील हे सांयकाळी समजेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT