Karnataka Election 2023 : कर्नाटकमध्ये 'आप' बिघडवणार भाजप, काँग्रेसचा खेळ ; या बड्या नेत्यांना उमेदवारी

AAP spoil the game of BJP and Congress: देशात 'आप'चे १६१ आमदार आहेत.
Karnataka Election 2023
Karnataka Election 2023Sarkarnama

Karnataka Election News: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाच्या जोरदार हालचाली सुरु आहे.

सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस सत्ता स्थापनेचा दावा करीत असताना या दोघांचे आम आदमी पार्टीने टेन्शन वाढवलं आहे. भाजप, काँग्रेस मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखत असताना 'आप'कडून नवीन डाव खेळला जात आहे.

भाजप,जेडीएस, काँग्रेसने उमेदवारांची यादी तयार करीत असतानाच आम आदमी पार्टीने उमेदवारांची यादी जाहीर करुन बाजी मारली आहे. त्यामुळे भाजप, काँग्रेसचा डाव आम आदमी पार्टी बिघडविणार का ? असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Karnataka Election 2023
Punjab Police : अमृतपाल सिंगचे सात फोटो, दोन video व्हायरल ; क्लीन शेव-दाढी-पगडीमधील..

कर्नाटकाच्या २२४ जागांसाठी आम आदमी पार्टीनं ८० उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यात कर्नाटकामधील बड्या नावाचा समावेश आहे. नोकरशहा, वकील, चित्रपट आदी क्षेत्रातील व्यक्तींना आम आदमी पक्षाने उमेदवारी दिली आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ शंतला दामले, मोहन दसारी ज्यांनी २०१३ आणि २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली हे दोन्हीही विधानसभेच्या रिंगणात आहेत. कर्नाटकचे प्रभारी पृथ्वी रेड्डी यांच्या नावाची चर्चा आहे.

Karnataka Election 2023
MNS Gudhipadwa Melava : राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण ? ; आजच्या मेळाव्यात नेमकं काय बोलणार ?

युवकांना उमेदवारी

या ८८ उमेदवारांमध्ये ५० टक्के उमेदवार हे युवा आहेत. त्यांचे वय ४५ वर्ष आहे. यात ७ महिला, ७ शेतकऱ्यांच समावेश आहे. त्यामुळे कर्नाटकमधील जुन्या-मोठ्या पक्षाच्या खेळ बिघडविण्यासाठी आम आदमी पार्टीने रणनीती आखली आहे.

देशात 'आप'चे १६१ आमदार

दिल्लीत सलग दोन वेळा सत्ता स्थापन केलेल्या 'आप'ने पंजाबमध्येही सरकार स्थापन केले आहे. पंजाबमध्ये ११७ पैकी ९२ जागा 'आप'ने पटकावल्या आहेत. गुजरातमध्ये ५ जागांवर 'आप'ने विजय मिळवित राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवला आहे. सध्या देशात 'आप'चे १६१ आमदार आहेत.

Karnataka Election 2023
PMP News : बस नीट चालवता येत नाही का? कारचालकाची पीएमपीच्या ड्रायव्हरला मारहाण; गुन्हा दाखल

भाजपवर लिंगायत समाज नाराज

आरक्षणाच्या मुद्यांवर कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वोक्कालिंगा हा मोठा समाज भाजपवर नाराज आहे. कर्नाटकमध्ये भाजपकडे नेतृत्व नसल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.अन्य राज्यामध्ये 'आप'ला मतदारांनी दिलेली पसंती कर्नाटकमध्येही मिळेल ? याची भीती काँग्रेस आणि भाजपला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com