3-Point Summary
20 वर्षांनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येत बेस्ट पतपेढी निवडणूक उत्कर्ष पॅनलमधून लढवत आहेत.
21 पैकी 19 जागा शिवसेना (उद्धव गट) आणि 2 जागा मनसेच्या वाट्याला; ही निवडणूक मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लिटमस टेस्ट मानली जात आहे.
महापालिकेसाठी युती जाहीर असली तरी जागा वाटपाचा निर्णय बाकी असून दोन्ही पक्ष कार्यकर्ते निवडणूक तयारीत आहेत.
मराठी भाषेच्या मुद्यांवरुन उद्धव-राज ठाकरे बंधू 20 वर्षानंतर एकत्र आले आहेत. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते एकत्र लढणार की स्वबळावर याकडे सगळ्याचे लक्ष लागले असताना मुंबईत बेस्ट पतपेढीच्या (दी बेस्ट एम्प्लॉइज को-ऑप. क्रेडिट सोसायटी) निवडणुकीत त्यांची युती झाली आहे. जागा वाटपही ठरलं आहे.
बेस्ट पतपेढीची निवडणूक ठाकरे बंधू एकत्रित लढवत असल्याने ठाकरे बंधूंच्या युतीची ही पहिली निवडणूक म्हणावी लागेल. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची आकडेवारी समोर आली आहे. यावरुन बेस्टच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हेच 'मोठा भाऊ" ठरले आहेत.
बेस्ट पतपेढी निवडणुकीत एकूण 21 जागापैकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष 19 तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना 2 जागा उत्कर्ष पॅनल म्हणून एकत्रित लढत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मनसेच्या पदरात दोनच जागा पडल्या आहेत.
निवडणूक जिंकण्यासाठी 11 जागा मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आगामी विशेषता मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बेस्ट पतपेढीची ही निवडणूक लिटमस टेस्ट ठरणार आहे.
बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे या दोन्ही पक्षांनी युती केल्यानं दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्य आनंदाचे वातावरण आहे. बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. दुसरीकडे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट आणि मनसेचे मेळावे, बैठकांचे सत्र सुरु आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र लढणार असल्याचे जाहीर केले असले तरी, जागा वाटपाबाबत अद्याप कुठलाही निर्णय दोन्ही पक्षाकडून घेण्यात आलेला नाही. कार्यकर्ते, पदाधिकारी मात्र निवडणुकीसाठी कामाला लागले आहे. पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहचवित आहेत.
उद्धव ठाकरे यांच्या'मातोश्री' निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ठाकरेंनी सर्व जागा लढण्यासाठी तयारी करा असं सांगितलं आहे. दुसरीकडे राज ठाकरे मुंबईतील प्रभागाचा आढावा घेत आहे. कुठल्या प्रभागात मनसेची ताकद जास्त आहे, हे जाणून घेत आहेत.
Q1. बेस्ट पतपेढी निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीत किती जागा ठरल्या?
A1. 21 पैकी 19 जागा शिवसेना आणि 2 जागा मनसेच्या वाट्याला आल्या.
Q2. ही उद्धव-राज ठाकरे युतीची पहिली निवडणूक आहे का?
A2. होय, बेस्ट पतपेढी निवडणूक ही त्यांची पहिली युतीची चाचणी आहे.
Q3. बेस्ट पतपेढी निवडणुकीचे मतदान कधी आहे?
A3. मतदान 18 ऑगस्ट रोजी होणार आहे.
Q4. महापालिका निवडणुकीसाठी जागा वाटपाचा निर्णय झाला आहे का?
A4. नाही, अद्याप जागा वाटपावर निर्णय झालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.