Uday Samant: शेवटच्या रांगेत बसून ठाकरे राहुल गांधीचं 'नाटक' बघत होते...; सामंतांचा टोला

Uddhav Thackeray India alliance Meeting: इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या.बैठकीचे फोटो भाजपने शेअर केले आहे. यात उद्धव ठाकरे मागच्या रांगेत बसल्याचे दिसते. त्यावर भाजपने टीका केली. बैठकीत ठाकरे यांचा अपमान झाल्याचा दावा भाजपने केला आहे.
Uddhav Thackeray, Uday Samant
Uddhav Thackeray, Uday SamantSarkarnama
Published on
Updated on

सारांश:

  1. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर टीका – मंत्री उदय सामंत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका करणाऱ्या नेत्यांवर निशाणा साधत, उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसून ‘नाटक’ पाहतात, अशी टिप्पणी केली.

  2. ईव्हीएमवर शंका टाकणाऱ्यांना राजीनाम्याचा सल्ला – राहुल गांधींवर टीका करत उदय सामंत म्हणाले की, ईव्हीएमवर शंका असेल तर निवडून आलेल्या खासदारांनी राजीनामा द्यावा.

  3. महायुतीच्या स्थानिक निवडणुकीसाठी भूमिका स्पष्ट – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका महायुती म्हणून लढणार असून, शिवसेनेच्या महापौर व जिल्हा परिषद अध्यक्षपदाची मागणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

Kolhapur, 08 Aug 2025: जे नेते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले म्हणून टीका करतात. त्या नेत्यांना शेवटच्या रांगेत बसवलं जातं हे महाराष्ट्राचे दुर्दैव. आमचे एकनाथ शिंदे दिल्लीत होते, ते पंतप्रधान यांच्या बाजूला बसले होते. त्याचे फोटो आले. उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसून राहुल गांधी यांचे 'नाटक' बघत होते. त्याचे फोटो आले.

शेवटच्या रांगेत बसलेले आमच्या एकनाथ शिंदेवर टीका करतात. त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यामुळे महाराष्ट्राला कळाले की कोणाची कुवत किती आहे. इकडे युतीवर चर्चा करायची इकडे आघाडीसोबत बोलायचे, त्यामुळे हे दिवस आलेत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मंत्री उदय सामंत यांनी टीका केली आहे.

ते कोल्हापुरात बोलत होते. बिहारची निवडणूक आली आहे, काहीतरी फेक नेरेटीव्ह पसरवला पाहिजे. त्यातून वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न राहुल गांधींचा काहीतरी उपद्रव्य सुरू आहे. लोकसभा निवडणूकमध्ये उमेदवार विजयी झाले. विधानसभा निवडणुकीमध्ये काही उमेदवार विजयी झाले. ईव्हीएम वर इतकेच शंका असेल तर ते लोकसभेला निवडून आले आहेत त्यांनी राजीनामा द्यावा. जर ईव्हीएम शंका असेल त्यांनी खासदार, आमदारांनी राजीनामा द्यावेत, असा सल्ला मंत्री उदय सामंत यांनी राहुल गांधींना दिला.

स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महायुती म्हणून सामोरे जायचे हा आदेश आहे. पण पक्ष संघटन म्हणून आम्ही दौरा करीत आहोत. भाजप त्यांच्या बैठकीत दावा करेल हे क्रमप्राप्त आहे. आम्ही देखील आमच्या बैठकी शिवसेनेचा महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष करा, असा सूचना देणार आहोत .पण या निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

Uddhav Thackeray, Uday Samant
Raju Shetti: व्हिडिओ शेअर करीत राजू शेट्टींनी मानले अंबानी परिवाराचे आभार

आज संगीतसूर्य केशवराव नाट्यगृह घटनेला एक वर्ष पूर्ण झाले, सरकारकडून २५ कोटीचा निधी दिला आहे. काही प्रशासकीय कामामुळे विलंब झाला. आता या ठिकाणी भेट देऊन काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या ठिकाणी सोलर पॅनल लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. बैठक क्षमता वाढवण्याच्या, या ठिकाणी चित्रपट दाखवण्याची व्यवस्था करण्याची सूचना दिल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यासाठी या ठिकाणी चित्रपट दाखवण्यासाठी याचा पर्याय होऊ शकतो. असेही मंत्री सामंत म्हणाले.

Q1. उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेवर काय टीका केली?
शेवटच्या रांगेत बसून 'नाटक' पाहणाऱ्यांनी इतरांवर टीका करू नये, असं ते म्हणाले.

Q2. ईव्हीएमवर शंका घेणाऱ्यांना उदय सामंतांनी काय सांगितलं?
ईव्हीएमवर शंका असेल तर संबंधित खासदार-आमदारांनी राजीनामा द्यावा.

Q3. महायुतीचा स्थानिक निवडणुकांबाबत काय निर्णय आहे?
महायुती म्हणून एकत्र लढण्याचा आदेश असून, शिवसेनेना महत्त्वाची पदे मागणार आहे.

Q4. संगीतसूर्य नाट्यगृह प्रकरणात काय अपडेट आहे?
२५ कोटींचा निधी मिळाल्याचे सांगत काम लवकरच पूर्ण करणार असल्याचं सांगण्यात आलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com