MNS city president seen outside Uddhav Thackeray’s Shiv Sena office, sparking political curiosity. sarkarnama
मुंबई

MNS-Shivsena UBT : मनसेचे शहराध्यक्ष थेट पोहोचले उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेवर! डोंबिवलीत मनोमिलन; ठाकरे बंधु एकत्र येणार?

Dombivali Rahul kamat Shivsena MNS : डोंबिवलीमधील मनसेचे शहराध्यक्ष थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेवर गेल्याने डोंबिवलीतही मनोमिलन झाल्याचे चर्चा आहेत.

शर्मिला वाळुंज

MNS-Shivsena UBT News : कल्याण शीळ रोडवरील पलावा पुलाच्या आंदोलनात मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आले. त्यानंतर ठाकरे बंधूची युती बाबत सर्वत्र पुन्हा चर्चा सुरु झाली. आता मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत गेले. तेथे त्यांनी ठाकरेंच्या शहराचे प्रमुखांची आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे-शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मनोमिलन झाल्याच्या पुन्हा चर्चा आहेत.

मनसेचे शहर अध्यक्ष राहुल कामत मंगळवारी डोंबिवली पश्चिमेकडील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेत गेले होते. त्यांनी ठाकरेंचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली. यावेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे यांनी कामत यांना शुभेच्छा देत पुष्पगुच्छ दिला. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डोंबिवलीत मनोमिलन

पलावा पुलाच्या निमित्ताने आंदोलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आले होते. मनसेचे माजी आमदार राजू पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिपेश म्हात्रे यांनी एकत्र आंदोलन करत आगामी राजकीय युतीचे संकेत दिल्याचे बोलल जात होते. आता डोंबिवलीमधील मनसेचे शहराध्यक्ष थेट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाच्या शाखेवर गेल्याने डोंबिवलीतही मनोमिलन झाल्याचे चर्चा आहेत.

बॅनरची राजकीय वर्तुळात चर्चा....

एकीकडे मनसेच्या नेत्यांनी डोंबिवलीत पुढाकार घेतला असताना ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने लावलेला भलामोठा बॅनरही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. ठाकरे गटाचे सहप्रवक्ते तुषार रसाळ यांनी हा फलक लावला आहे. या फलकावर, 'दोन मराठी वाघांनी एकत्र येणे ही महाराष्ट्राची इच्छा', असा मजकूर लिहला आहे. या फलकावर आदित्य ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, संजय राऊत यांच्या फोटोसह राज ठाकरे, अमित ठाकरे, बाळा नांदगावकर यांचे फोटो एकत्र दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT