Radhakrishna Vikhe Patil : नितेश राणेंनंतर विखे पाटलांचे विधान चर्चेत; म्हणाले, कोणताही पक्ष भाजपच्या बरोबरीला...

Radhakrishna Vikhe Patil’s Bold Statement on BJP’s Dominance : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे बाप असल्याचे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे.
Minister Radhakrishna Vikhe Patil addressing media, asserting that no political party can match the strength of BJP in the current landscape.
Minister Radhakrishna Vikhe Patil addressing media, asserting that no political party can match the strength of BJP in the current landscape. Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोणी काय विचार करावा? हा त्या राजकीय पक्षांचा प्रश्न आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहे. देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांचे नेतृत्व आहे. सर्वात जास्त विधानसभेमध्ये जागा जिंकणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे भाजपच्या बरोबरीला अन्य पक्ष कधीच येऊ शकत नाहीत, असे विधान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महायुतीचे बाप असल्याचे विधान मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यावरून बराच वाद निर्माण झाला आहे. आता विखे पाटील यांनी भाजपबरोबर कोणताही पक्ष कधीच येऊ शकत नाही, असे सांगत भाजप इतर पक्षांपेक्षा सर्वाधिक ताकदवान असल्याचे सूचक विधान केले आहे.  

प्रत्येकाने इच्छा ठेवायला हरकत नाही. पण राज्यात भाजपाचा नेहमी महायुतीमध्ये विधानसभेत सुद्धा आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत सुद्धा भाजपा राज्यात सर्व ठिकाणी सत्तेवर येईल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना व्यक्त केला.

Minister Radhakrishna Vikhe Patil addressing media, asserting that no political party can match the strength of BJP in the current landscape.
Local Body Elections: सरकारच्या निर्णयामुळे सगळं प्लॅनिंग फिस्कटलं; इच्छुकांसमोर नव्याने बांधणी करण्याचे आव्हान...

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रभाग रचनेच्या निर्णयावरून बोलताना, स्थानिक स्वराज्य रचना महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये प्रभाग रचने संदर्भात स्थानिक नेतेच जास्त निर्णय घेऊ शकतील. कारण या नेत्यांना तेथील भौगोलिक परिस्थिती माहीत असते. पुनर्रचना करण्यासंदर्भातला प्रश्न फार जटील नसल्याचे विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

अलमट्टीमुळे धरणाची उंची वाढीसंदर्भात सातत्याने चर्चा सुरू आहे. अद्यापही सर्वोच्च न्यायालयात त्याला स्थगिती आहे. राज्य सरकारने त्यामध्ये तेलंगणा आणि आंध्रप्रदेश सोबत चर्चा केलेली आहे. कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढू द्यायची नाही. हीच सरकारची भूमिका आहे. अलमट्टी संदर्भात राज्य सरकार न्यायालयात गेलेलं नाही, असं म्हणणं पूर्णतः चुकीचे आहे, असे विखे पाटील यांनी सांगितले.

Minister Radhakrishna Vikhe Patil addressing media, asserting that no political party can match the strength of BJP in the current landscape.
COVID alert : कोरोनाचा धोका वाढला, पंतप्रधान मोदीही झाले सावध; भेटीगाठींबाबत घेतला मोठा निर्णय...

महायुती आमदार निधीवरून बोलताना ते म्हणाले, ‘घर मोठं आहे. थोड्या कुरघोड्या होणार. याचा अर्थ फार मोठं काही घडलंय असं नाही.’ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबाबत बोलताना विखे पाटील म्हणाले, जयंत पाटील यांचा आणि माझा फारसा संबंध नाही. मात्र त्यांनी देखील त्यांच्या संघटनेचे अडचणीच्या काळातही नेतृत्व केलेले आहे. नवनवीन लोकांना संधी मिळायला पाहिजे. पण त्यांची भाजपमध्ये येण्यासंदर्भात अशी कुठलीही चर्चा झालेली नसल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com