MNS on Irrigation scam : MNS Criticize To BJP :  Sarkarnama
मुंबई

MNS Criticize To BJP : सिंचन घोटाळ्यावरून मनसेने केली भाजपची कोंडी; फडणवीस-अजितदादांना टोकदार सवाल !

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात आता राजकीय संघर्ष दिवसागणिक पेटत चाललेले दिसून येत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवारांनी एन्ट्री घेऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मनसेने भाजपवर टिकेची राळ उठवली आहे. याआधी अजित पवारांवार भाजपने केलेल्या सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावर ठेवत मनसेनेकडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची(अजित पवार गट) कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. (Latest Marathi News)

महाराष्ट्रात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना आणि त्यावेळी भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावाताना अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते. सिंचन घोटाळ्या प्रकरणी बैलगाडीभर पुरावे सादर करू असे त्यापूर्वी भाजपकडून सांगण्यात येत होते. सोशल मीडियावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाले आहे. फडणवीस विरोधी पक्षात असतानाचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये फडणवीस म्हणतात की, "आमचं सरकार आल्यानंतर अजित पवार जेलमध्ये असतील, अजितदादा चक्की पिसिंग अँड पिसिंग."

मनसेने याच मुद्द्यावर बोट ठेवत भाजपवर निशाणा साधला आहे. मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत म्हंटले आहे की, "भाजपने २०१९ म्हणजेच ४ वर्षांपूर्वीच एक चांगली घोटाळ्यांची मालिका मांडली होती. हे अजूनही महाराष्ट्र विसरलेला नाही. सिंचन घोटाळा महाराष्ट्राच्या सिंचन विभागात २००० च्या दशकात झालेला आक्राळविक्राळ महाभयंकर घोटाळा. एका युरोपीय देशाचा अर्थसंकल्प पण या आकड्यापुढे लाजेल एवढा प्रचंड घोटाळा या थोर चोर नेत्यांनी केला," अशा शब्दात मनसेकडून भाजपला कोंडीत पकडण्यात आले आहे.

दरम्यान, सिंचन घोटाळा आता राज्यसरकारमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) यांची डोकेदुखी ठरणार आहे. अजित पवारांवर ज्यानी सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते, आता त्याच अजित पवारांचा भाजपप्रणित राज्याच्या सरकारमध्ये समावेश झाला आहे. तसेच, एनडीए घटक पक्षाचाही अजित पवार घटक आहेत. यामुळे सिंचन घोटाळ्यावरून विरोधकांनांनंतर आता मनसेही भाजपला कोंडीत पकडले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT