Sandeep Deshpande Replied BJP : थोबाड बंद ठेवणाऱ्या भाजपने मनसेला शिकवू नये; संदीप देशपांडेंनी फटकारले

MNS- BJP Politics : मनसेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरचा टोलनाका फोडल्यानंतर मनसे आणि भाजपमधील यांच्यातील शाब्दिक चकमकी झडत आहेत.
 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest newsSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : समृद्धी महामार्गावरचा टोलनाका मनसेच्या कार्यकर्त्यांनी फोडल्यानंतर मनसे आणि भाजपमधील यांच्यातील शाब्दिक चकमकी झडत आहेत. ट्विट करत भाजपने टोलनाके फोडण्याआधी बांधायला शिका आणि शिकवा, असा सल्ला दिल्यानंतर मनसेने थेट मणिपूरमधील हिंसाचारावर भाष्य करत भाजपला आरसा दाखवण्याचाच प्रयत्न केला आहे. यामुळे भाजप-मनसेतील हा वाद टोकाला जाण्याची शक्यता आहे.

समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर भाजपा महाराष्ट्र या ट्विट अकाऊंटवरून मनसे कार्यकर्त्यांच्या टोलफोडीचा व्हिडिओ शेअर करत," अमीत ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, " असा सल्ला दिला आहे.

 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
Mumbai Police Recruitment: पोलीस दलात कंत्राटी भरती; काय आहे कारण ?

या नंतर मनसेचे प्रवक्ते संदिप देशपांडे यांनी ट्विटमधूनच भाजपला उत्तर दिलं आहे. " भाजपला उत्तर देण्यासाठी मनसेने उत्तर दिलं आहे. "मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजपामहाराष्ट्र ला मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का ? असं ट्विट करत भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्यांचे पक्ष फोडले ते टोल बांधण्याबद्दल आम्हाला काय शिकवणार. त्यांनी दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा आधी स्वत: चा पक्ष बांधावा.

एक टोल फुटला म्हणून थोबाड उघडणारे, ज्यावेळी मणिपूरमध्ये एवढ्या घटना घडल्या त्यावेळी महाराष्ट्र भाजपचं थोबाड बंद का होत, टोलनाक्यांच्या कंत्राटदारांची दलाली करायची आहे का, असा सवालही देशपांडे यांनी विचारला आहे. २०१४ ला जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार सत्तेत येणार होतं त्यावेळी त्यांनी राज्यातले टोलनाके बंद करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याचं काय झालं आणि भाजपने आम्हाला दादागिरीबद्दल शिकवू नये. आम्हाला ती व्यवस्थित करताही येते आणि निभवताही येते.

 MNS Sandeep Deshpande Latest News Updates, MNS Latest news
Shivsena Disqualification Case : ठाकरे गटाची अस्वस्थता वाढणार; शिवसेना आमदार अपात्रतेचे प्रकरण लांबणीवर पडणार?

टोलनाक्यावर किती किलोमीटर पर्यंत रांगा असाव्यात याबाबत काही नियम आहेत, ते नियम टोलवाले पाळत आहेत का, टोलनाक्यावर अॅम्ब्युलंस असणे ही टोलवाल्यांची जबाबदारी आहे, ती त्यांनी पूर्ण केली का, समृद्धी महामार्गावर एवढे अपघात झाले, महामार्गावर काही किलोमीटर अंतरावर अॅम्ब्युलंस असावी, ती त्यांनी पूर्ण केली का, या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्यावं आमच्या गोष्टीत नाक खुपसण्याची गरज नाही, अशा सडेतोड शब्दात देशपांडेंनी भाजपला उत्तर दिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com