Raj Thackeray, Amit Thackeray, Mahesh Jadhav Sarkarnama
मुंबई

MNS Politics : अमित ठाकरेंकडून मारहाणीचा आरोप करणाऱ्या महेश जाधवांची मनसेतून हकालपट्टी

Mahesh Jadhav : मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांचा व्हिडीओ पोस्ट...

सरकारनामा ब्यूरो

जुई जाधव

Mumbai News : मनसे पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पक्षाला आज घरचा आहेर दिला आहे. मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव यांनी अमित ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी फेसबुक लाईव्ह करीत हा सगळा प्रकार समोर आणला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताच त्यांच्यावर काही तासात पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मनसे (MNS) नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्याकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. हा व्हिडीओ त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केला आहे. अमित ठाकरे यांनी मारहाण केली असून त्यांच्या डोक्याला इजा झाल्याचं त्यांनी व्हिडीओत दाखवलं आहे.

पक्षातून हकालपट्टी

मनसेनेते अमित ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेनेतील सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. 'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना 'महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेने'शी कोणताही संबंध नसेल, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मराठी कामगार सेना' ह्या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे. त्यामुळे 'मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी, 'मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी सदस्यांशी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना' या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल, ह्याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी," असे पत्र मनसेचे ज्येष्ठ नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी राज ठाकरे यांच्या आदेशानुसार काढले आहे.

(Edited By - Rajanand More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT