MLA Disqualification Case : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठी अपडेट; काय म्हणाले राहुल नार्वेकर?

Rahul Narwekar On Shiv Sena MLA Disqualification Case : निकालाच्या काही तास आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय म्हणाले?
Shivsena MLA Disqualification
Shivsena MLA Disqualification Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra MLA Disqualification :

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर मोठी अपडेट समोर आली आहे. गोव्यात असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी माहिती दिली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे. यासंदर्भातील जी काही आवश्यक कारवाई करायची आहे, ती पूर्ण करून उद्या निकाल देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.

या प्रकरणात जवळजवळ 34 याचिका होत्या. सव्वा दोन लाख पानांची तपासणी करायची होती. त्यामुळे हा निकाल द्यायला किमान इतका वेळ लागणारच होता, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Shivsena MLA Disqualification
Uddhav Thackeray : आमदार अपात्रतेच्या निकालाआधीच ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये घालमेल ?

उद्धव ठाकरेंना संशय

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर ठाकरे गटाने आक्षेप नोंदवला आहे. नार्वेकर आणि शिंदेंच्या भेटीविरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. शिंदे आणि नार्वेकर यांची मिलीभगत आहे का? असा सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'काय न्याय मिळणार?'

आदित्य ठाकरे यांनीही राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर आक्षेप घेतला आहे. वर्षा बंगल्यावर सेटलमेंट करायला लवादाचे अध्यक्ष असलेले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर गेलेत, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. दीड वर्षे हे प्रकरण खेचल्यानंतर न्याय काय मिळेल? जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाइड.

या प्रकरणात बघितलं तर दोन प्रकार होऊ शकतात. घटनेनुसार 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. दुसरे म्हणजे जे भाजपला संविधान बदलायचं आहे तर, आम्ही बाद होऊ. हा प्रश्न फक्त आमच्याबद्दल नाही तर, संपूर्ण जग बघतंय. भारताकडे लोकशाही देश म्हणून पाहिलं जातं.

लोकशाही टिकणार की नाही? या प्रकरणात संपूर्ण जगाचं लक्ष हे महाराष्ट्रावर आहे. अध्यक्ष भारताचं नाव खराब करून घेणार नाही, अशी अपेक्षा असल्याचे आदित्य ठाकरे कोल्हापुरात म्हणाले.

(edited by sachin fulpagare)

Shivsena MLA Disqualification
Uddhav Thackeray News : 'उद्या वेडावाकडा निकाल दिला तर..' ; आमदार अपात्रता प्रकरणी ठाकरेंचा सूचक...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com