Sanjay Raut, Sharad Pawar, Raj Thackeray, Devendra Fadnavis Sarkarnama
मुंबई

MNS Vs Shivsena UBT : "बारामतीच्या हातच्या खुळखुळ्याने उगीच..." राज ठाकरेंवरील 'ती' टीका मनसेच्या जिव्हारी, राऊतांना दिलं जोरदार प्रत्युत्तर

Ameya Khopkar On Sanjay Raut : "खिळखिळ्या पक्षाच्या स्वयंघोषित प्रवक्त्यांची निवडणुकीत ढेपाळल्यानंतर चांगलीच करपलेली दिसतेय. हल्ली रोज सकाळी करपट ढेकरा ऐकायला मिळत आहेत. बारामतीच्या हातच्या खुळखुळ्याने उगीच खुळ्यागत बोलून का स्वतःची आहे-नाही ती इभ्रत घालवावी?"

Jagdish Patil

Mumbai News, 08 Dec : "बारामतीच्या हातच्या खुळखुळ्याने उगीच खुळ्यागत बोलून का स्वतःची आहे-नाही ती इभ्रत घालवावी?" असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काल माध्यमांशी बोलताना राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणे झाले आहेत, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांचं हे वक्तव्य मनसे नेत्यांच्या चांगलंच जिव्हारी लागलं आहे. त्यामुळे आता अमेय खोपकर यांनी राऊतांवर तोफ डागली आहे. खोपकर यांनी एक्सवर एक पोस्ट करत राऊतांवर टीका केली.

त्यांनी लिहिलं की, "खिळखिळ्या पक्षाच्या स्वयंघोषित प्रवक्त्यांची निवडणुकीत ढेपाळल्यानंतर चांगलीच करपलेली दिसतेय. हल्ली रोज सकाळी करपट ढेकरा ऐकायला मिळत आहेत. बारामतीच्या हातच्या खुळखुळ्याने उगीच खुळ्यागत बोलून का स्वतःची आहे-नाही ती इभ्रत घालवावी?

आम्ही मनसैनिक या असल्या खुळखुळ्यांच्या पिचक्या आवाजाकडे लक्षही देत नाही. आमचे राजसाहेब समर्थ आहेत आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे सदैव आहोत आणि राहणार हेच सत्य आहे, बाकी बालिश वटवटीला आम्ही भीक घालत नसतो," अशा शब्दात त्यांनी राऊतांवर टीका केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका मुलाखतीत बोलताना भविष्यात स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत राज ठाकरेंच्या मनसेला बरोबर घेण्याचा प्रयत्न करू, असं म्हटलं होतं. फडणवीसांच्या याच वक्तव्याचा आधार घेत राऊतांनी राज ठाकरेंना टोला लगावला होता.

राऊत म्हणाले, "राज ठाकरेंना भाजपकडून खेळवलं जात आहे. ते भाजपच्या हातातील खेळणे झाले आहेत. भाजप सांगेल त्या पद्धतीने राज ठाकरे भूमिका घेत आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही बोलायचं नाही. त्यांनी लोकसभा, विधानसभा आणि आता महानगरपालिकेत काय करायचं? हे फडणवीस ठरवत आहेत." राऊतांच्या याच टीकेमुळे आता मनसे नेते आक्रमक झाले असून त्यांनी राऊतांवर पलटवार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT