
Mumbai News, 08 Dec : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. या निकालात महायुतीला भरघोस यश मिळालं तर महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) सुपडासाप झाला. निकाल लागल्यापासूनच आघाडीच्या नेत्यांनी आपल्या पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडल्याचं पाहायला मिळत आहे.
अशातच माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मारकरवाडी (Markarwadi) येथून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी ईव्हीएम विरोधात एल्गार पुकारला आहे. जानकर यांनी बॅलेट पेपरवर पोटनिवडणूक घ्या मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो असं चॅलेंज दिलं आहे.
तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांचे बंधू आणि नवनिर्वाचित आमदार सुनील राऊत यांनी देखील आमदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्रात लागलेला निकाल हा अत्यंत अविश्वसनिय असून या निकालामुळे राज्यातील जनता अजिबात खुश नाही.
हा निकाल अविश्वासनीय असून मला सुद्धा या निकालावर विश्वास नाही. त्यामुळे जर बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेत असतील तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार असल्याचं सुनील राऊत (Sunil Raut) यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, "महाराष्ट्रात लागलेला निकाल हा अत्यंत अविश्वसनीय असून या निकालामुळे राज्यातील जनता अजिबात खुश नाही. जे उमेदवार जिंकले आहेत ते सुद्धा सरप्राईज आहेत की आम्ही कसे जिंकलो? आणि जे पराभूत झाले आहेत त्यांनाही असं वाटत आहे की आम्ही कसे हरलो?
माझ्या बाबतीत सुद्धा ज्या प्रकारे रिस्पॉन्स होता आणि लोक सांगत होते की मला जवळपास 50 ते 60 हजार इतके मताधिक्य मिळायला पाहिजे होते. त्यामुळे माझी देखील अशी मागणी आहे की, जर पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार असतील तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे."
दरम्यान, महायुती जिंकली आहे पण महायुती जिंकेल असं कोणाला वाटलं नव्हतं, महाविकास आघाडी जिंकली पाहिजे होती असं वातावरण या संपूर्ण महाराष्ट्रात होतं. EVM घोटाळा केल्यामुळेच महायुतीचा विजय झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.