Amit Thackeray Latest Marathi News
Amit Thackeray Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

Amit Thackeray News : मनसे नेते अमित ठाकरेंचा सर्वात मोठा दावा; म्हणाले, ''आपण लवकरच सत्तेत असू आपली...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्यातील सत्तांतरानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या भेटीगाठीत वाढ झाली आहेत. तसेच विविध मुद्द्यांवर पत्रं, टि्वट तर कधी प्रत्यक्ष भेटूनही सरकारला सल्ले देत आहेत. तसेच आगामी काळात ठाकरे गटाला खिंडीत पकडण्यासाठी भाजप शिवसेनेला मनसे फॅक्टर नक्कीच फायद्याचा ठरु शकतो हा अंदाज वर्तविला जात आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याचवेळी आता राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी मोठा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचा मेळावा आज मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अमित ठाकरे यांनी लवकरच सत्तेत येण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. ठाकरे म्हणाले, "आपण इथे फक्त कामगार सेनेची ताकद बघायला आलोय. तुम्ही उगाच माझं नाव घेतात. हे सगळे तुमचे कष्ट आहेत. तुम्ही म्हणालात कधी कधी 50 टक्के काम होतात, कधी कामं होत नाहीत. पण आपण लवकरच सत्तेत असू, आपली 100 टक्के कामं पूर्ण होतील असं वक्तव्य मनविसेचे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray)यांनी केलं आहे.

राज ठाकरेंची अनुपस्थिती....

मुंबईतील मनसेच्या कामगार मेळाव्याला मनसे नेते अमित ठाकरे, शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत, शर्मिला ठाकरे, मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण, मनसे प्रवक्ते गजानन काळे उपस्थित होते. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे मात्र कामगार मेळाव्याला अनुपस्थितीत होते.यामुळे त्यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली.

मनसे नेते बाळा नांदगावकर कामगार मेळाव्यात राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. नांदगावकर म्हणाले, "सध्या राजकारणात कुस्त्या सुरु आहेत. उद्धव ठाकरेंची कुस्ती एकनाथ शिंदेंसोबत सुरु आहे तर फडणवीससोबत सुद्धा कुस्ती सुरु आहे. संजय राऊत विरुद्ध नितेश राणे अशी कुस्ती सुरु आहे. अजित पवार यांची घरातच कुस्ती सुरु आहे. बारसूमध्ये पण कुस्ती सुरु आहे. कोण कोणाच्या समर्थनार्थ आहे कोण विरोधात हेच कळत नाही. राज ठाकरे यांची या कुस्तीत एन्ट्री होईल असा इशाराही दिला आहे.

''पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे..''

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी यावेळी संवाद साधला. त्या म्हणाल्या,"अमित राजकारणात आल्यापासून मी आळशी झाली आहे. मी आज इथे येणार नव्हते. पण फक्त तुमच्यासाठी मी इथे आलेय. कामगार कपात सगळीकडे सुरु आहे. त्यात आपण कामगारांना न्याय देत आहात. तुमच्या कामाचं कौतुक करण्यासाठी मी इथे आले आहे. पुढच्या वर्षी मी येणार नाही. कारण पुढच्या वर्षी माईक हा अमितच्या हातात गेला पाहिजे असंही ठाकरे यावेळी म्हणाल्या.

राज ठाकरेंची तोफ रत्नागिरीत धडाडणार...

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 6 मे रोजी रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे. ठाकरे यांनी अनेकदा कोकण आणि रत्नागिरी दौरा केला असला तरीही मनसे प्रमुख म्हणून त्यांची रत्नागिरीत प्रथमच सभा होणार आहे. रत्नागिरी शहराची भौगोलिक रचना बघता ही सभा नेमकी कुठे होणार याबाबत पक्षाचे पदाधिकारी पडताळणी करत होते. त्यातच ही सभा शहरातील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर होणार अशी चर्चा सुरु झाली. अशातच आता जिल्ह्यातील रिफायनरीचा मुद्दा तापला आहे. मनसेच्या टीझरमध्येही याची झलक पाहायला मिळाली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT