Shivsena-MNS| 
मुंबई

'टोमणे मेळाव्याचे भाषण तयार आहे...; मनसेने शिवसेनेला डिवचलं...

Dasara Melava Politics| Shivsena-MNS| राज्यातील सत्तांतरानंतर यंदा पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होत आहेत.

सरकारनामा ब्युरो

Dasara Melava Politics| मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर यंदा पहिल्यांदा दोन दसरा मेळावे होत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोघांनीही मुंबईत दसरा मेळाव्याची जय्यत तयारी केली आहे. शिंदे गटाचा यंदा बीकेसी मैदानावर दसरा मेळावा होणार आहेत, तर ठाकरे गटाचा नेहमीप्रमाणे शिवतीर्थीवर दसरा मेळावा होणार आहे.

अशात दसरा मेळाव्याच्या वादात मनसेने उडी घेतली आहे. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत केलं आहे. ''टोमणे मेळाव्याचे भाषण तयार आहे ... हसा चकट फु ...'' असं लिहीत शिवसेनेला डिवचलं आहे. याशिवाय एका चित्रातून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. '' साहेब आजच्या भाषणात कोणते मुद्दे असतील, असा मजकूर असून त्यासोबत 'भिकार पी..जे बॉम्ब, मावळे कावळे बॉम्ब, मर्द छाताड बॉम्ब'' असेही या चित्रातून दाखवण्यात आले आहे. तसेच, हसरा मेळाव्याची तयारी, असा टोलाही या चित्रातून लगावण्यात आला आहे.

दसरा मेळाव्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असून मेळाव्याला जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा निर्धार शिंदे गटाकडून व्यक्त करण्यात आला असून ३ लाख लोक गोळा करण्याचे नियाजन आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी देखील आपल्या कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी जमवण्यास सांगितले.

उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरु झाली आहे. ठाकरे गटाकडून पक्षातील पदाधिकारी, शाखाप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यावर विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्याची माहिती मिळते. आजपर्यंत झाला नाही असा दसरा मेळावा भरवण्याकरिता पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यामुळे यंदाच्या दसऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT