MNS Politics : माहीम मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, माहीम मतदारसंघाबाबत उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेत येथे एकही सभा घेणार नसल्याचे जाहीर केले.
उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे माहीम मतदारसंघात सभा घेणार नसले तरी मनसेचे वरळीतील उमेदवार संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना माहीममध्ये सभा घ्याच, असे चॅलेंज दिले आहे.
संदीप देशपांडे म्हणाले, 'त्यांनी सभा घ्यावी आम्ही त्यांना आडवले नाही. उमेदवार उमेदवार द्यायचा आणि सभा घ्यायची नाही ही नाटकं कशाला? सभा घेऊन देखील अमित निवडून येणार आहे. त्यांचा उमेदवार पडणार आहे म्हणून सभा घेत नाहीत. फालतूची सहानुभूती घ्यायची फार सवय आहे उबाठाच्या लोकांना.'
उद्धव ठाकरेंनी माहीम हा शिवसेनेचा, आपला बालेकिल्ला असल्याने तेथे सभा घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. उद्धव ठाकरे अमित ठाकरे उमेदवार असलेल्या ठिकाणी सभा घेणार नसले तरी राज ठाकरे हे आदित्य ठाकरे उमेदवार असलेल्या वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे यांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत.
याविषयी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, आदित्य जरी त्यांचा पुतण्या असल्या तरी मी त्यांचा कार्यकर्ता आहे. माझ्यावर जास्त प्रेम आहे म्हणून माझ्यासाठी सभा घेत आहेत.
माहीम मतदारसंघात अमित ठाकरे हे मनसेचे उमेदवार आहेत. तर, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सदा सरवणकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महेश सावंत येथे उमेदवार आहेत. त्यामुळे माहीम मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.