Vidhnsabha Election News : विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून 60 महिला रिंगणात; संख्या वाढली पण प्रमाण अत्यल्पच

Political News : या निवडणुकीत महायुतीकडून 30 महिलांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 महिला निवडणूक रिंगणात उतरवल्या आहेत.
Mayra Kale, Rohini Khadse, Ashvini kadam, deepika Chavan, sulkshana shilvant
Mayra Kale, Rohini Khadse, Ashvini kadam, deepika Chavan, sulkshana shilvant Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात महिला उमेदवारांना संधी दिली जाईल असे वाट होते. मात्र 2019 च्या निवडणुकीच्या तुलनेत महिला उमेदवाराची संख्या वाढली असली तरी हे प्रमाण अत्यल्प असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांना संधी मिळण्यासाठी वाट पहावी लागणार आहे. या निवडणुकीत महायुतीकडून 30 महिलांना संधी देण्यात आली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीने 30 महिला निवडणूक रिंगणात उतरवल्या आहेत.

येत्या निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या भाजपने सर्वाधिक 18 महिलांना विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली आहे. शिवसेना (एकनाथ शिंदे) 8 तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (Congress) केवळ 4 महिलांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली आहे. सध्या महायुतीमध्ये महिला उमेदवारांमध्ये 12 विद्यमान आमदार आहेत.

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून सर्वाधिक 11 महिलांना विधानसभा निवडणुकीत उभे केले आहे. काँग्रेसने 9 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षांने 10 महिलांना यावेळी संधी दिली आहे. आघाडीतील महिला उमेदवारांमध्ये दोन विद्यामान आमदार असून विरोधकांनी उमेदवारी देताना नव्या चेहऱ्यांना पसंती दिली आहे.

दोन्ही पक्षांनी महिलांना डावलले

शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे प्रतिमहिना 1500 रुपये दिल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ जोरदार प्रचार करत आहेत. विधानसभेची उमेदवारी देताना या दोन्ही पक्षांनी महिलांना डावलले असून एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी लाडकी बहीण प्रत्यक्षात ‘नावडती’ ठरली असल्याची चर्चा जोरात सुरु आहे.

Mayra Kale, Rohini Khadse, Ashvini kadam, deepika Chavan, sulkshana shilvant
MVA News : पुण्यातील बंडोबांचा थंडोबा करण्यात महाविकास आघाडी अपयशी

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) 12, काँग्रेसने 15, राष्ट्रवादीने 9 आणि शिवसेनेने 9 महिलांना विधानसभा निवडणूक लढवण्याची संधी दिली होती. 49 महिला उमेदवारांमधून 24 महिला आमदार झाल्या होत्या. त्यावेळी 288 सदस्यांच्या विधानसभेत महिलांचे प्रमाण केवळ आठ टक्के होते.

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर झाले आहे. मात्र जनगणना आणि मतदारसंघ परिसीमन झाले नसल्याने त्याची अंमलबजावणी झालेली नाही. महिला आरक्षणाच्या विधेयकानुसार राज्याच्या विधानसभेत 96 महिलांना प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे येत्या काळात तरी राज्यतील महिला उमेदवारांची संख्या वाढणार का याची उत्सुकता लागली आहे.

Mayra Kale, Rohini Khadse, Ashvini kadam, deepika Chavan, sulkshana shilvant
Beed News: प्रचारादरम्यान माजी आमदार विसरले स्वत:चे चिन्ह; दुसऱ्यालाच मतदान करण्याचे केले आवाहन

महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50 टक्के आरक्षण आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी 49 महिला उमेदवार दिले होते. तुलनेत यावेळी 60 महिलांना उमेदवारी मिळाल्याने प्रतिनिधित्वाचे प्रमाण वाढले असले तरी हे प्रमाण अत्यल्प आहे. राज्यात महिला मतदारांची संख्या 4 कोटी 69 लाख 96 हजार 279 आहे.

Mayra Kale, Rohini Khadse, Ashvini kadam, deepika Chavan, sulkshana shilvant
Raksha Khadse Politics: नणंद रोहिणी खडसेंचा प्रचार करणार का?, मंत्री रक्षा खडसे यांनी स्पष्टच सांगितले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com