Sandeep Deshpande  Sarkarnama
मुंबई

MNS News : उद्धव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाची चर्चा; मनसे नेत्याचं खोचक टि्वट; म्हणाले,'' भावी पंतप्रधानांना...!''

Uddhav Thackeray : बुरा ना मानो होली है...”

सरकारनामा ब्यूरो

Sandeep deshpande Taunt to Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या 2024 साठी विरोधीपक्षांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. याचवेळी ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे हे पंतप्रधानपदासाठी उत्तम चेहरा आहेत असं विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसेनं उध्दव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेंनी उध्दव ठाकरेंच्या पंतप्रधानपदाच्या चर्चेवर ट्विट केलं आहे. या टि्वटद्वारे देशपांडे यांनी खोचक टीका केली आहे. भावी पंतप्रधानांना शुभेच्छा. भंकस वाटली असेल तर माफ करा. पण बुरा ना मानो होली है” असं या ट्वीटमध्ये संदीप देशपांडेंनी म्हटलं आहे. तसेच, आता तुमच्याशी हिंदीतच बोललं पाहिजे. तुम्ही आता पंतप्रधान होणार.. मज्जा आहे बाबा एका माणसाची अशा शब्दांत संदीप देशपांडें(Sandeep Deshpande) नी ठाकरेंना टोला लगावला आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

२०२४ लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचा उत्तम चेहरा आहे असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. यावेळी त्यांनी राजकारणात काहीही घडू शकतं. उद्धव ठाकरे हा एक उत्तम चेहरा आहे. महाविकास आघाडीने ठरवलं होतं की, ठाकरे जर मुख्यमंत्री होणार असतील तर आपण एकत्र येऊ आणि सरकार स्थापन करु. आज विरोधी पक्षात जे प्रमुख चेहरे आहेत. त्यामध्ये उद्धव ठाकरे यांचा चेहरा अनेकांना महत्त्वाचा वाटतो. कारण एकतर महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते ठाकरे आहेत. ते हिंदुत्ववादी आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. याचा विचार भविष्यात आमचे इतर सहकारी करू शकतात असंही राऊत यावेळी म्हणाले होते.

देशपांडेंवरील हल्ल्यानंतर मनसे ठाकरे गट आमने सामने

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यामध्ये संदीप देशपांडे यांच्या पायाला आणि हाताला दुखापत झाली आहे. रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर संदीप देशपांडे यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. यानंतर मनसे आणि ठाकरे गटातील वातावरण आरोप प्रत्यारोपांनी पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात झाली आहे. यातच देशपांडे यांनी हल्ल्यानंतर पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढविला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT