Sharad Pawar in Dehu : तब्बल २४ वर्षांनी शरद पवारांचं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत पाऊल; म्हणाले...

NCP Political : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो...
Sharad Pawar in Dehu : तब्बल २४ वर्षांनी शरद पवारांचं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत पाऊल; म्हणाले...

Pune News : देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत, यात देहू आणि शेगाव यांसारखी काही ठिकाणं आहेत असं म्हणत तब्बल २५ वर्षांनी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देहूत पाऊल ठेवलं.

शरद पवार यांच्या उपस्थितीत संत तुकाराम महाराजां(Saint Tukaram Maharaj) च्या जीवनकार्यातील प्रसंगचित्रण यावर आधारित दिनदर्शिका अनावरण सोहळा देहूत आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, मी देव-दानव या भानगडीत फारसा पडत नाही. यापासून लांबच असतो. मात्र काही देवस्थानं अशी आहेत, जी माझ्या अंत:करणात वसली आहेत. त्यापैकी एक म्हणजे शेगाव, आळंदी आणि देहू आहेत. या मंदिरात गेल्यानंतर मला मानसिक समाधान मिळतं.

Sharad Pawar in Dehu : तब्बल २४ वर्षांनी शरद पवारांचं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत पाऊल; म्हणाले...
Ramdas Athawale : '' मोदींना हरवणं येड्या गबाळ्याचं काम नाही..''; रामदास आठवलेंचा उध्दव ठाकरेंना टोला

मागील ४०० वर्षांपासून समाजाला योग्य दिशा देण्याचं महान काम कोणी केलं असेल तर ते नाव म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराज यांचं आहे. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून हे कार्य केलं आहे. त्यांनी शब्दांच्या माध्यमातून हे कार्य केलं आहे. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. देहूला गेल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नसतं. जगद्गुरूंची सेवा करणं खूप गरजेचं असतं असे गौरवोद्गार देखील शरद पवार(Sharad Pawar) यांनी काढले.

शरद पवार यांनी आज जगद्गुरु संत तुकोबारायांचे मुख्य मंदिरात येऊन दर्शन घेतलं. यावेळी देहू(Dehu) संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिभा पवारही उपस्थित होत्या. पवार म्हणाले, देव, धर्म यापासून मी बाजूला असतो. पण माझ्या अंतःकरणात काही ठिकाणं आहेत, त्यातील शेगाव एक आहे. आता ते गृहस्थ सध्या नाहीत, मात्र त्यांचे आणि आमचे घरोब्याचे संबंध आहेत. त्याच शेगावचे हे कलाकार असल्यानं आनंद झाला असंही पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar in Dehu : तब्बल २४ वर्षांनी शरद पवारांचं संत तुकाराम महाराजांच्या देहूनगरीत पाऊल; म्हणाले...
Pune News : ...अखेर पीएमपीच्या कंत्राटदारांचा संप मिटला, प्रवाशांना मोठा दिलासा

गोपीचंद पडळकरांचा पवारांना टोला

शरद पवार यांनी तब्बल २५ वर्षांनंतर देहूत पाऊल ठेवलं.यावरुन भाजप नेते व आमदार गोपीचंद पडळकर(Gopichand Padalkar) यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. पडळकर म्हणाले, शरद पवार २४ वर्षानंतर देहूला गेले आहेत, आणि तेही तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी मग २४ वर्षांपूर्वी तुकाराम महाराजांची समाधी नव्हती का ? तुकाराम महाराज नव्हते का असा टोला शरद पवार यांना गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. शरद पवार किती शहाणे आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे मी त्यांना जास्त गांभीर्याने घेत नसल्याचं पडळकर म्हणाले.

राज ठाकरेंची पवारांवर नास्तिक असल्याची टीका...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक आहेत. ते कुठल्याही मंदिरात देव दर्शनासाठी जात नाहीत असा टोलाही लगावला होता. यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं.यानंतर पवारांनी दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात गेले होते. मात्र, मंदिरात न जाता मंदिराच्या दारातूनच माघारी परतले होते. त्यावरूनही मोठा वादंग निर्माण झाला होता. मात्र, शरद पवारांनी सोमवारी (दि.६) देहूमध्ये संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com