Aditya Thackeray| Sandeep Deshpande|
Aditya Thackeray| Sandeep Deshpande| Sarkarnama
मुंबई

Sandeep Deshpande News :''वरळीतून निवडून न येण्याची जाणीव असल्यामुळेच...''; संदीप देशपांडेंचा ठाकरेंना खोचक टोला

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : ठाकरे गटाचे नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे नेहमीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील नेत्यांवर तिखट शब्दांत हल्लाबोल करत असतात. ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्यावरील हल्ल्याचा निषेध म्हणून काढलेल्या भव्य मोर्चातही ठाकरेंनी ठाण्यातून निवडणूक लढवण्याचा निर्धार बोलून दाखवत शिंदेंचा पराभव करणारच असं आव्हान दिलं होतं. त्याला मुख्यमंत्र्यांनी पलटवार देखील केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे.

संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यानी काही दिवसांपूर्वीच कोरोना काळातील कारभारावर मुंबई महापालिकेतील कंत्राटं, गैरव्यवहारावरुन ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. यावरुनच त्यांच्यावर मॉर्निंग वॉकला जात असताना हल्ला करण्यात आला होता. मात्र, त्यांच्यानंतरही त्यांनी माघार न घेता उलट ठाकरे गटावर टीका केली होती. आता पुन्हा एकदा देशपांडेंच्या निशाण्यावर आदित्य ठाकरे आले आहे.

आदित्य ठाकरें(Aaditya Thackeray))च्या मुख्यमंत्र्यांवरील टीकेवर संदीप देशपांडे टि्वटद्वारे भाष्य केलं आहे. त्यांनी टि्वटमध्ये आदित्य ठाकरेंना वरळीतून निवडून न येण्याची जाणीव असल्यामुळेच ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाही ना असं म्हणत खोचक टीका केली आहे.

काय आहे संदीप देशपांडे यांचं टि्वट?

मनसे ठाकरे गट वरळीतील जनता सेटिंग लावून निवडून गेलेल्या आमदारावर नाराज आहे.आपण पुन्हा वरळीतून निवडून येणार नाही याची जाणीव झाल्यामुळे ठाण्याला पळून जाण्याचा प्रयत्न तर चालू नाहीना ??? अशा शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी माजी मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरेंना टोला लगावला आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले होते?

महाविकास आघाडीकडून काढण्यात आलेल्या ठाण्यात जनक्षोभ मोर्चात बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मिमिक्री केली होती. तसेच स्वतःच्या शहरामध्ये, जो स्वतःचा बालेकिल्ला मानायचे, ते आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं, चॅलेंज द्या, मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हानही दिलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT