AAP Jalandhar News: काँग्रेसच्या बालेकिल्याला AAP ने पाडले खिंडार; माजी आमदाराला 'आप' कडून तिकीट

Jalandhar Lok Sabha by-election : काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे.
Jalandhar Lok Sabha by-election
Jalandhar Lok Sabha by-election Sarkarnama
Published on
Updated on

Jalandhar Lok Sabha by-election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या पाहणीत काँग्रेसला सत्ता मिळेल, असा अंदाज व्यक्त केला असताना पंजाबमध्ये मात्र काँग्रेसला मोठा झटका बसला आहे.

जालंधर मतदारसंघात काँग्रेसचा मोठा फटका बसला आहे, माजी आमदार, दलित नेते सुशील कुमार रिंकू यांनी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. सुशील कुमार यांच्या 'आप'मधील प्रवेशाच्या वेळी 'आप'चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यावेळी उपस्थित होते.

Jalandhar Lok Sabha by-election
BJP News : काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांचा मुलगा भाजपमध्ये

त्यांना जालंधर लोकसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाने तिकीट दिले आहे. काँग्रेसने येथे आपला उमेदवार जाहीर केला आहे. पण सुशील कुमार रिंकू यांच्या 'आप'मधील प्रवेशामुळे येथील राजकीय समीकरण बदलणार असल्याचे जाणकारांचे मत आहे. 'आप'ने जालंधर पश्चिमचे माजी आमदार सुशील कुमार रिंकू यांनी तिकीट दिल्याने काँग्रेसच्या गोटात चिंता वाढली आहे.

Jalandhar Lok Sabha by-election
Roshani Shinde Attack Case : रोशनी शिंदे हल्ल्याप्रकरणी महिला आयोग आक्रमक ; पोलीस आयुक्तांना..

१० मे रोजी जालंधर लोकसभा पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर कमरजीत कौर यांच्या नावाची घोषणा केली होती, पण दलित नेता सुशील कुमार रिंकू विरोधात असल्यामुळे काँग्रेसची राजकीय समीकरण बिघडली आहेत. कमरजीत कौर या काँग्रेसचे माजी खासदार दिवंगत संतोख सिंह चौधरी यांच्या पत्नी आहेत.

Jalandhar Lok Sabha by-election
BJP foundation day : वाजपेयींच्या त्या भाषणांची आठवण करुन देत पवारांनी दिल्या भाजपला खोचक शुभेच्छा!

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान संतोख चौधरी यांचे ह्दयविकाराने निधन झाले होते. त्यामुळे ही पोटनिवडणुक होत आहे. आता काँग्रेस येथे कुणाला मैदानात उतरवणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. २० एप्रिल ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

Jalandhar Lok Sabha by-election
Ghulam Nabi Azad : 'आझाद' मधून काँग्रेस नेत्यांची पोलखोल ; जयराम रमेश यांच्यावर गंभीर आरोप.. ; कलम ३७० बाबत..

जालंधर हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. गेल्या विधानसभेच्या वेळी जेव्हा पंजाबमध्ये आप आदमी पक्षाचे लाट असताना जालंधर मध्ये काँग्रेसने ९ जागांपैकी ५ जागांवर विजय मिळवला आहे. सुशील कुमार रिंकू यांच्या माध्यमातून आप आदमी पक्षाचे नजर जालंधरच्या दलित व्होटबॅकवर आहे. ते २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com