Shishir Shinde Resign Shivsena UBT Sarkarnama
मुंबई

MNS News : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या शिशिर शिंदेंना मनसे नेत्याचा फुकटचा पण प्रामाणिक सल्ला; म्हणाले, ''आता...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी रविवारी (दि.१८) ठाकरे गटाचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर ते भेट नसल्याचा गंभीर आरोप करत आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शिंदे यांचा राजीनामा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, मनसे नेत्यानं आता ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्या शिशिर शिंदे यांना डिवचतानाच फुकटचा पण प्रामाणिक सल्ला दिला आहे.

वर्धापन दिनाच्या आधीच ठाकरे गटाला मोठे धक्के बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे उपनेते शिशिर शिंदे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. तर विधान परिषद आमदार मनिषा कायंदे या ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावेळी शिंदे यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. याचवेळी मनसे नेत्यानं शिंदेंना डिवचलं आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी शिशिर शिंदे(Shishir Shinde) यांच्यावर निशाणा साधला आहे. खोपकर म्हणाले, “शिशीर काका, बस करा हे आता हे धंदे …खरंतर निवृत्तीचे वय झालंय. इकडून तिकडे बेडूक उड्या मारणे शेाभत नाही. मागे वळून बघण्याचा विचार सुद्धा करू नका. सतत बाळासाहेब, बाळासाहेब करून ना कधी सहानुभूती मिळाली आणि ना कधी मिळणार. आता घरी बसून आराम करा. फुकटचा पण प्रामाणिक सल्ला आहे, घ्यायचा तर घ्या नाहीतर सोडून द्या असा टोला खोपकर यांनी शिंदे यांना लगावला आहे.

शिशिर शिंदे कोण आहेत..?

शिशिर शिंदे यांना राज ठाकरे(Raj Thackeray) यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांपैकी शिंदे एक होते. मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते पण २०१४ ला त्यांचा पराभव झाला. २०१८ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. आणि नंतर ते ठाकरे गटात दाखल झाले. आता पुन्हा त्यांनी शिवसेनेत आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंनाही जय महाराष्ट्र केला आहे.

शिंदेंचे ठाकरेंवर गंभीर आरोप ?

शिशिर शिंदे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकताना उध्दव ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे. शिंदे म्हणाले, गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय. पण ते भेटत नाहीये. अनेकवेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण पक्षप्रमुख भेटतच नव्हते. गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यानंतर केवळ नावापुरत पद दिलं गेलं. त्यामुळे राजकीय आयुष्यातली चार वर्ष वाया गेली असा आरोप करत त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT