Raju Patil News Sarkarnama
मुंबई

Raju Patil News: मनसेच्या इंजिनमुळे महायुतीची गाडी स्पीड पकडेल; राजू पाटलांची फटकेबाजी...

Dombivli News : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) उपस्थित होते. त्यांनी महायुतीच्या नेत्यांना मिश्किलपणे टोमणे मारले.

शर्मिला वाळुंज

Dombivli Political News : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते झाले. या सोहळ्याला मनसेचे आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) उपस्थित होते. त्यांनी महायुतीच्या नेत्यांना मिश्किलपणे टोमणे मारले.

"हे म्हणायचे ट्रिपल इंजिन सरकार आहे. पण खर इंजिन आमचं आहे. आमचं इंजिन लागल्यामुळे नक्कीच गाडी स्पीड पकडेल," असा टोला त्यांनी लगावला. श्रीकांत शिंदे तिसऱ्यांदा हॅटट्रिक मारतील, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या नेत्यांना राजू पाटलांनी चिमटा काढला. "हे बोलायचे ट्रिपल इंजिनच सरकार आहे, परंतु खर इंजिन आमचं आहे," असे राजू पाटील म्हणताच प्रेक्षागृहात एकच हशा पिकला. व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनादेखील हसू आवरणे जमले नाही.

राजू पाटील म्हणाले, "शिंदे यांनी चांगली कामं केलीत त्याबद्दल काही शंका नाही. आमच्यात लुटूपुटू झाली असेल. पण राजकारण हे असे चालतेच. पण शिंदे यांच्याशी मी कधी लिंक तोडली नाही. आम्ही खऱ्या मनाने आज इथे उपस्थित राहिलो आहोत. त्यामुळे शंका घ्यायची गरज नाही की मनसे काम करेल की नाही,"

आमच्या समोर जे उमेदवार दिलेत ते दोन्ही आमचे पक्ष सोडून गेलेत. भिवंडी व कल्याण लोकसभा मतदारसंघ असेल त्यांची काम अशी ही आम्ही करणार नव्हतो. त्यामुळे तो काही विषय नाही, असे राजू पाटलांनी सांगितले.

आमदार पाटील म्हणाले, काही गोष्टी सांगू इच्छितो, श्रीकांत शिंदे यांचा जो कार्य अहवाल दाखवला गेला. त्यांनी नक्कीच चांगली कामे केली आहेत. मी जेव्हा विधानसभेला उभा राहिलो, तेव्हा एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून इथे काम करेल असं बोलून उभं राहिलो होतो. आणि मी चॅलेंज देऊन सांगतो की खासदार शिंदे यांनी कल्याण ग्रामीणमध्ये जितका निधी दिला, तितका इतर कुठे दिलेला नाही.

लोकसभेसाठी महायुतीला मनसेने बिनशर्त पाठिंबा दिला म्हणून आमच्यावर जे ओरडतात खरं तर आम्ही या निवडणुकीत कुठेच नाही. मोदीजी चांगलं काम करतात म्हणून चांगल्या हेतूने पाठिंबा दिलाय. समोर कोणीच नाही जेव्हा विरोध करायचा तेव्हा ठोकून विरोध केलेला आहे.

मी जेव्हा निवडून आलो तेव्हा शिंदे यांचा फोन आलेला समर्थनाची वेळ आल्यावर समर्थन देणार का? अजितदादा यांचादेखील फोन आला त्यांनी तर मला पाठिंबा दिला होता, ठराव केला होता. त्यामुळे पाठिंबा देणार एकदा वरिष्ठांशी बोलून घ्या, असे मी त्यांना सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे यांचे व माझे जे काही पक्षप्रमुख होते, त्या काही अडचणी होत्या. त्यांना राज यांना विचारणे काही जमलं नाही. 2014 ला तसेच घडले. ती जर घटना घडली असती तर आम्ही खासदारकीला उभे राहिले नसतो आमच्यात जे झाले ते झाले नसते असे आमदार पाटील म्हणताच त्यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी खूण केली. यावर आमदार म्हणाले, सांगू दे माझी माणसं आहेत त्यांना मनमोकळे काम करायचे आहे. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत.

"सरकार बदललं. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांचा फोन आला सरकारला समर्थन हवं आहे. त्यावेळेस आमचे प्रमुख राज ठाकरे यांना विचारले म्हणून सरकारला समर्थन दिले. विधान परिषद, राज्य सभा, अध्यक्षपदाची निवडणूक, राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत समर्थन दिले. त्यामुळे हे कोणी आम्हाला विचारलं आमच्या साहेबांना विचारलं त्यांना समर्थन दिले," असे पाटील म्हणाले.

Edited by: Mangesh Mahale

R.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT