Sujay Vikhe Patil: आमदार जगताप बरोबर, तरी खासदार विखेंना अनिलभैया स्मरतात...

Nagar South Lok Sabha Constituency 2024: शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया यांनी सुजय विखेंसाठी खूप मेहनत घेतली. कोविड काळात अनिलभैयांचे निधन झाले. यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला.
Sujay Vikhe Patil news
Sujay Vikhe Patil newssarkarnama
Published on
Updated on

Nagar Political News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये राजकीय घमासान सुरू आहे. दोन्ही बाजूने विजयाचा दावा होत आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय विजयाची गणिते मांडली जात आहेत.

जो कोणी उमेदवार लोकसभेत निवडून येईल, त्या विजयामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघ निर्णायक ठरेल. भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांच्याबरोबर गेल्यावेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड होते. या वेळी खासदार विखेंबरोबर अनिलभैयांऐवजी महायुतीत राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप आहे. असे असले, तरी खासदार विखेंना अनिलभैयांची आठवण स्मरते!

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात खासदार सुजय विखे यांना भाजपकडून दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. सुजय विखे यांना २०१९ मध्ये भाजपकडून नगर दक्षिणमध्ये पहिल्यांदा उमेदवारी मिळाली. त्यावेळी देशात भाजप-शिवसेना युती होती.

सुजय विखे यांना नगर शहरात लॉच व्हायचे होते. तशी धडपड सुरू होती. शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया यांनी सुजय विखेंसाठी खूप मेहनत घेतली. कोविड काळात अनिलभैयांचे निधन झाले.

यानंतर राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. पुढे शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटली. शिवसेना फुटल्यानंतर नगर शहरातून बोटावर मोजण्याइतकेच कार्यकर्ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेले.

Sujay Vikhe Patil news
Mohua Moitra: TMCच्या उमेदवाराकडे हिऱ्याची अंगठी, कोट्यवधींच्या ठेवी; महुआ मोइत्रांकडे सिल्व्हरचा डिनर सेट

अनिलभैया यांचे पुत्र विक्रम राठोड यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आमच्या रक्तात आहेत. हिंदुत्व आमचे रक्त आहे. उद्धव ठाकरेंबरोबर राहणार, अशी गर्जना केली. नगर शहरातील शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिले.

शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच नगर शहरातील लोकसभेच्या निवडणुकीला समोरे जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आता महाविकास आघाडीबरोबर आहे. यात भाजपचे उमेदवार खासदार विखे यांनी शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैया राठोड यांची आठवण येते आहे.

अनिलभैयांच्या आठवणीत खासदार विखेंचे मन भरूनदेखील आले होते. "अनिलभैयांनी माझ्यासाठी जे केले आहे, ते कोणीच करू शकत नाही. त्यामुळे या निवडणुकीच्या धामधुमीत मी त्यांना कधीच विसरू शकत नाही", अशी प्रतिक्रिया खासदार विखेंनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

खासदार सुजय विखे म्हणाले, "अनिलभैयांनी माझ्यासाठी केलेले प्रयत्न मी कधीही विसरणार नाही. नैसर्गिक युती होती. ती तुटली. पहिली शिवसेना आमच्यापासून लांब गेली. म्हणजेच भाजपपासून लांब गेली. आम्ही काय त्यांना सोडले नाही.

ते महाविकास आघाडीच्या सत्तेत गेले. पुढे पक्षाचे विभाजन झाले. भैयांचे पुत्र विक्रम राठोड ते इकडे आले नाहीत. ते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेबांकडे आले नाहीत. ते समोर थांबले, पण ते काहीही असो, अनिलभैयांचे मूळ हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्व आणि विचारावर आधारीत होते,"

अनिलभैयांनी त्यांच्या विचारांच्या आधारावर राजकारण केले. अनिलभैयांनी देखील त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेदेखील बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचाराने घडवले. आजही ते कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरे आणि अनिलभैय्या यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनुसार काम करताना दिसतात.

बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांशी अनिलभैया जोडून होते. त्यामुळे त्यांना नगरमध्ये मोठ्या कालावधीसाठी जनतेने निवडून दिले. अनिलभैयांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्व विचाराला कधीही तडा जावू दिला नाही.

आजही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार भाजप आणि महायुती पुढे घेऊन चालली आहे. म्हणून नगर शहरात कालचा मतदार, जो अनिलभैयांना मानतो, तो महायुतीबरोबर राहील, असा विश्वास खासदार विखे यांनी व्यक्त केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com