Raju Patil, Raj Thackeray
Raju Patil, Raj Thackeray  Sarkarnama
मुंबई

...तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा अटळ; मनसे आमदार राजू पाटीलांचा इशारा

सरकारनामा ब्यूरो

डोंबिवली : मनसेने (MNS) उद्या अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाआरतीचं आयोजन केलं होतं. त्यासंबंधित आदेश राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर आता मनसेकडून हा महाआरतीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. उद्या (ता.3 मे) रमजान ईद या सणासाठी व्यत्यय येऊ नये म्हणून हा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याचं सांगितलं आहे. मात्र, आता मनसे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी ट्विटरवरून इशारा दिला आहे. जर, ४ मे पर्यंतचा भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटम पाळला गेला नाही तर, तर, दुप्पट आवाजातली हनुमान चालीसा अटळ आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजू पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, व्हिडिओ 'तपासणी'सोबत भोंगे 'उपसणी' पण सुरू ठेवा. कालची ‘राज’गर्जना पोलिस बांधव आणि सरकारच्या कानावर आदळली असेलच. जर, ४ मे पर्यंतचा भोंगे उतरवण्याच्या अल्टिमेटम पाळला गेला नाही तर, दुप्पट आवाजातली हनुमान चालीसा अटळ आहे. आधी भोंगे उतरवा, ही सरकार आणि पोलिस प्रशासनाला नम्र विनंती..!, अशा शब्दात पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे.

दरम्यान, महाआरतीबाबत राज ठाकरे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत मी बोललो आहेत. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही, असे राज यांनी स्पष्ट केलं आहे.

भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं; हे मी उद्या माझ्या ट्विटद्वारे आपल्यासमोर मांडेन, असंही त्यांनी सांगितलं आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी तीन तारखेलाचा अल्टीमेटम दिला आहे. अन्यथा चार तारखेपासून मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालीसा लावण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे आता ते उद्या काय भूमिका मांडणार याबाबतही उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT