Prasad Ghorpade Join Shivsena
Prasad Ghorpade Join Shivsena  Sarkarnama
मुंबई

MNS Navi Mumbai News : मनसेला मोठं खिंडार ; नवी मुंबईत बड्या नेत्याच्या हाती धनुष्यबाण ; शिवसेनेत नवी राजकीय इनिंग..

सरकारनामा ब्यूरो

MNS Navi Mumbai Prasad Ghorpade Join Shivsena: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) नवी मुंबईत मोठा धक्का बसला आहे.

मनसेच्या मोठ्या नेत्याने शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. त्यांचा शिवसेनेतील प्रवेशामुळे नवी मुंबईतील मनसेतील गळती सुरुच असल्याचे चित्र आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

नवी मुंबई मनसे शहर प्रमुख गजानन काळे यांच्यावर गंभीर आरोप करणारे मनसेचे उपशहर प्रमुख प्रसाद घोरपडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यांनी दीड महिन्यांपूर्वी पदाचा राजीनामा दिला होता. शिंदे गटाकडून घोरप़डे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांच्या राजीनाम्याची मनसेत कुणीही दखल घेतली नाही, त्यांची समजूत काढण्यासाठी मनसेचा एकही नेता त्यांच्याकडे गेला नाही. पक्षनेतृत्वानेही गजानन काळे यांना समज दिली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या घोरपडेंनी हाती धनुष्यबाण घेतला.

घोरपडे यांनी अखेर शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करुन नव्या राजकीय इनिंगची सुरुवात केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

घोरपडे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवलं होतं. हे पत्र घोरपडेंनी फेसबुकवर शेअर केलं होतं. पक्षातील माझ्या सर्व सहकारी मित्र, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची प्रथम माफी मागतो कळवू इच्छितो की पक्षातील अंतर्गत बाबी याचा गेले काही महिने मी सामना करत होतो, ज्याला कंटाळून मी काल माझ्या नवी मुंबई उपशहर अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बाकी समाजासाठी माझे काम हे नेहमी चालूच राहील. तूर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र! असे त्यांनी पत्रात म्हटलं होतं. (Latest Political News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT