DR Babasaheb Ambedkar Jayanti : धक्कादायक : आंबेडकर जयंतीची तयारी करणाऱ्या दलित नेत्याची गोळ्या झाडून हत्या

DR Babasaheb Ambedkar Jayanti Rakesh Paswan News : नमस्कार केला, अन् गोळया झाडल्या..
 Rakesh Paswan News
Rakesh Paswan News Sarkarnama
Published on
Updated on

DR Babasaheb Ambedkar Jayanti Rakesh Paswan News : देशभर आंबेडकर जयंती साजरी होत असताना एक दुःखद बातमी समोर येत आहे.

आंबेडकर जयंतीची तयारी करणाऱ्या एका बड्या नेत्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणाखाली आहे.

बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील ही घटना आहे. काल (गुरुवारी) आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला हा प्रकार झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आरएलजेपीचे नेता व भीम आर्मीचे राष्ट्रीय सचिव राकेश पासवान यांची हत्या करण्यात आली आहे.

 Rakesh Paswan News
Karnataka Elections 2023 : कर्नाटकमध्ये पहिल्याच दिवशी २२१ जणांचे अर्ज ; भाजप २७, काँग्रेसकडून...

चेहरा झाकलेले चार अज्ञान व्यक्ती दुचाीकीवरुन आले. त्यांनी प्रथम पासवान यांना नमस्कार केला, काही वेळानंतर पासवान यांच्या पाठिमागून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

 Rakesh Paswan News
Summons To Arvind Kejriwal: मुख्यमंत्र्यांना गोवा पोलिसांची नोटीस, २७ एप्रिलला हजर राहण्याचा आदेश

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पासवान यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले. पण उपचारा दरम्यान राकेश पासवान यांचा मृत्यू झाला. पासवान यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या संतप्त समर्थकांना रुग्णालयात घोषणाबाजी केली. रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली.

 Rakesh Paswan News
Changes In NCERT Book : देशाच्या पहिल्या शिक्षणमंत्र्यांचा संदर्भ NCERT ने हटवला ..

हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. पासवान हे आपल्या घराजवळ आंबेडकर जयंतीची तयारी करीत असताना हा हल्ला झाला.

पासवान यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी बिहार पोलिसांनी ठिकठिकाणी छापेमारी करण्यास सुरवात केली आहे. पासवाना यांच्या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

(Edited By Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com