Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : शिवसेनेत जे राजकारण चालू होते, त्याचा शेवट म्हणजे शिंदेंचे बंड; राज ठाकरेंनी सगळेच सांगितले

MNS News : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा बट्याबोळ झाला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Raj Thackeray News : गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहतो आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणाचा बट्याबोळ झाला आहे. हे सगळे राजकारण पाहात असताना मला वाईट वाटत होते. मात्र, ज्यावेळेला शिवसेना (Shivsena) आणि धनुष्यबाण हे तुझे का माझे की तुझे सुरु होते, तेव्हा वेदना होत होत्या, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शिवाजी पार्क मैदानावरून कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी ते म्हणाले, लहानपणापासून मी तो पक्ष पाहात आलो आहे, तो पक्ष जगलो आहे. मी दुसरीत होतो तेव्हा माझ्या शर्टवर वाघ असायचा, अशी आठवण राज ठाकरे यांनी सांगितले. मी राजकारण लहान असल्यापासून पाहात आलो आहे. बाळासाहेबांच्या सोबत अनुभवत आलो. शिवसेना अनेक लोकांच्या कष्टातून उभी राहिली.

मी जेव्हा त्या पक्षातून बाहेर पडलो त्या पक्षातून बाहेर पडल्यानंतर मी इथे जेव्हा भाषण केले होते तेव्हा म्हटले होते. ''माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. मी तेव्हा हेदेखील म्हटले होते हीच चार टाळकी हा पक्ष खड्ड्यात घालणार आहेत. २००६ मध्ये जेव्हा मी पक्ष स्थापन केला, तेव्हा तो याच शिवतीर्थावर केला होता. मात्र, त्या भाषणात काय झाले कशामुळे झाले तो चिखल करायचा नव्हता, आजही करायाचा नाही आहे. मात्र, काही गोष्टी पसरवल्या गेल्या आहेत. राज ठाकरेंना शिवसेनापक्षप्रमुख पद हवे होते. राजला मिळाले नाही म्हणून बाहेर पडला, माझ्या स्वप्नातही हा विचार आला नव्हता, असेही राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेचे धनुष्यबाण हे शिवधनुष्य होते. हे शिवधनुष्य बाळासाहेब ठाकरे सोडून इतर कुणालाही पेलणार नाही, मला माहित होते. एकाला झेपले नाही दुसऱ्याला बघा आता झेपते का? आत्ताच त्यांच्या बाजूच्या लोकांनाही सांगतो माझे बोलणे झाल्यावर उद्या तोंड उचकटू नका, नंतर मी जे काही बोलेन त्यामुळे तोंड लपवावे लागेल, असा इशारा राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे) गटाच्या नेत्यांना दिला. सगळ्यांना तो महाबळेश्वरचा प्रसंग आठवतो आहे. मात्र, त्याआधी अनेक गोष्टी घडल्या. हे मी सांगतोय कारण आत्ताची परिस्थिती तुम्हाला समजेल, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मी एके दिवशी उद्धवसोबत हॉटेल ओबेरॉयला गेलो होतो. तिथे मी त्याला बसवलो आणि उद्धवला विचारले की तुला काय हवे आहे? तुला पक्षाचा प्रमुख व्हायचं आहे का? हो. तुला मुख्यमंत्री व्हायचे असलेत तर सत्ता आल्यावर हो. मला फक्त सांग की माझ काम काय आहे? मला फक्त प्रचाराला बाहेर काढू नका. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाही आहे. मी विचारले ठरले? तो म्हणाला हो ठरले. मी घरी आल्यावर बाळासाहेब ठाकरे झोपले होते. मी त्यांना उठवले त्यांना सांगितले सगळी समस्या सोडवली आहे.

आमच्या दोघांमध्ये आता काही वाद नाही आहेत. बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले उद्धवला बोलवा. पाच मिनिटे तो आला नाही. बाळासाहेबांनी मला सांगितले त्यांना बोलवा बोलावयाला गेलो तो तिथून निघून गेले होते. त्यावेळी मला कारण नसताना त्रास दिला जात होता. मी बाहेर कसा पडेन यासाठी सगळे राजकारण सुरु होते, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

नारायण राणे यांनी शिवसेना सोडलीच नसती. राणे पक्ष सोडणार कळत होते मी त्यांना फोन केला होता. मी त्यांना सांगितले की मी बाळासाहेबांशी बोलतो, त्यावेळी मी बाळासाहेबांना फोन केला. बाळासाहेब मला म्हणाले की नारायण राणे यांना घेऊन ये. पाच मिनिटांनी परत मला फोन आला की नको आणूस, मला तेव्हा त्यांच्या मागून कुणीतरी बोलत, असा आवाज आला. तेव्हा मला राणे यांना सांगावे लागले की येऊ नका. मग सगळ्या पुढच्या गोष्टी घडल्या आहेत. लोकांनी पक्षातून बाहेर पडावे यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली आहे. जी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली, त्याचा हा शेवट असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला त्यांच्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT