Raj Thackeray on Toll  Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : मुलुंड टोल नाक्यावर 'मनसे स्टाईल'ची झलक; राज ठाकरेंनी स्वत: रस्त्यावर उतरत...

Jui Jadhav

Mumbai News: राज्यातील महामार्गांवर आकारण्यात येणाऱ्या टोलविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल विरोधात आवाज उठवला होता, त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घातलं होतं. तसेच आवश्यक ते बदल करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र त्या नियमांचं पालन होताना दिसत नाही, यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले आहेत. (Raj Thackeray on Toll )

नाशिकचा दौरा आटोपून शुक्रवारी राज ठाकरे हे मुंबईकडे जात असताना ठाणे आणि मुंबईच्या सीमेवर असलेल्या टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हे पाहून राज ठाकरे स्वत: रस्त्यावर उतरले आणि लोकांना रस्ता करुन दिला. यानंतर खूप वेळापासून झालेली वाहतूक कोंडी काही क्षणात सुटली. यानंतर राज ठाकरे यांनी टोल नाक्यावरील व्यवस्थेसंदर्भात संताप व्यक्त केला. तसेच टोलनाक्यावरील मॅनेजरला लोकांना त्रास देवू नका, असा ठाकरे शैलीत इशारा दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे हे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. त्यांचं मनसे स्टाईल आंदोलन सगळ्यांना ज्ञात आहे. टोल वाढीच्या प्रश्नावरून राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी आक्रमक झाले होते. मात्र राज्य सरकारकडून त्यांना आश्वासन देण्यात आले होते. परंतु देण्यात आलेले आश्वासनं पूर्ण होताना दिसत नसल्याने राज ठाकरेंना संताप अनावर होऊन स्वतः टोल नाक्यावर उतरून त्यांनी गाड्यांसाठी वाट मोकळी करून दिल्याचे आज पाहायला मिळाले.

मॅनेजरची केली कानउघडणी

राज ठाकरे यांच्या गाड्यांचा ताफा हा टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडीत अडकला होता. दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असताना देखील टोलनाक्यावरील कर्मचारी टोलची वसुली करत होते. त्यामुळे संतप्त झालेले राज ठाकरे हे स्वतःच्या वाहनातून उतरले आणि टोलनाक्यावर गेले. त्यांनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असतानाही होत असलेल्या टोल वसुलीबाबत तेथील कर्मचाऱ्यांची आणि मॅनेजरची चांगलीच कानउघडणी केली. तसेच लोकांना त्रास देवू नका, असे म्हणत थेट इशारा दिला.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT