Patan BJP : उदयनराजेंचे हात बळकट; विक्रमबाबा पाटणकरांवर फडणवीसांनी सोपवली मोठी जबाबदारी

Vikrambaba Patankar: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर पाटण विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली.
Vikrambaba Patankar
Vikrambaba PatankarSarkarnama
Published on
Updated on

Patan News : जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम पाटण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाटण तालुक्यातील प्रत्येक गावनिहाय भाजपच्या कार्यकर्त्यांचे जाळे असणाऱ्या पाटणकर यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जबाबदारी सोपवली आहे. ( Patan Assembly Constituency 2024)

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी मुंबईत चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पाटण विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून विक्रमबाबा पाटणकर यांच्यावर जबाबदारी सोपवल्याचे अधिकृत पत्र दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vikrambaba Patankar
Manoj Jarange Patil: फडणवीसांच्या 'होम डिपार्टमेंट'चा जरांगेंबाबत मोठा निर्णय; सुरक्षेसाठी 24 तास...

बावनकुळे म्हणाले, 'विक्रमबाबा पाटणकर यांच्यासारखे तडफदार नेतृत्व भाजपला लाभले आहे. अतिशय संयमी असलेल्या विक्रमबाबांवर पक्षाची फार मोठी जबाबदारी आहे. पाटण तालुक्यात सर्वांना बरोबर घेवून जाणारा धडाडीचा नेता म्हणून विक्रमबाबांची विशेष ओळख आहे. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी ते संयमाने पार पाडतील'.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विक्रमबाबांना शुभेच्छा देताना, कार्यकर्ता ते नेता कसा असावा ? याचे उत्तम उदाहरण म्हणून विक्रमबाबांना पाटण तालुक्यासह जिल्हा ओळखतो. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या बाबांना ग्रामीण आणि शहरी भागातील व्यक्तींशी नाळ जोडली गेली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय असलेले विक्रमबाबा सर्वांना परिचित आहेत. त्यांना भविष्यात लागेल तसे सहकार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, भाजपचे सातारा लोकसभेचे संयोजक आणि भाजप प्रदेश कार्यकारीण सदस्य सुनील काटकर, सुशांत निंबाळकर, पंकज चव्हाण तसेच मान्यवर उपस्थित होते.

(Edited By-Ganesh Thombare)

Vikrambaba Patankar
Lok Sabha Elections 2024 : 'माढ्या'वरुन राजकारण तापलं; दोन निंबाळकरांमध्ये जुंपली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com