Raj Thackeray, Amit Thackeray, Bala Nandgaonkar, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Amit Thackeray : अमित ठाकरेंनीच खोडून काढला बाळा नांदगावकरांचा दावा; म्हणाले, "दोन ठाकरे..."

Amit Thackeray On Raj Thackeray And Uddhav Thackeray Unity : महाराष्ट्राच्या राजकारणात सतत राज ठाकरे आणि प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चा सुरू असतात. अशातच बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

Jagdish Patil

Mumbai News, 26 Oct : "राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील", असं वक्तव्य मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केलं होतं. मात्र, त्यांचा हा दावा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी खोडून काढला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सतत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे आणि ठाकरेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येणार का? याबाबतच्या चर्चा सुरू असतात.

नुकतंच मनसेचे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी शिवडी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे भविष्यात एकत्र येतील, असा विश्वास व्यक्त केला होता.

त्यांच्या या वक्तव्यामुळे खरंच दोन्ही ठाकरे एकत्र येणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. मात्र, आता अमित ठाकरेंनीच (Amit Thackeray) हे दोन्ही भाऊ एकत्र येणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. साम टीव्हीला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलताना ते म्हणाले, "दोन भाऊ एकत्र यावेत ही चर्चा आता माझ्यासाठी संपली आहे.

तसंच 2014 आणि 2019 ते दोघे एकत्र यावे यासाठी प्रयत्न झाले होते. तेव्हा मलाही वाटायचं. पण 2017 नंतर तो विषय माझ्यासाठी संपला आहे." शिवाय ते एकत्र येण्याची आता शक्यताच नाही का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, "माझ्याकडून तरी किमान यापुढे चर्चा नाही. तो विषय माझ्यासाठी संपला आहे."

बाळा नांदगावकर नेमकं काय म्हणाले?

बाळा नांदगावकर म्हणाले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विचार काही बाबतीत भिन्न आहेत, परंतु भविष्यात ते एकत्र येतील, अशी माझी खात्री आहे. देशालाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे की, मी ठाकरेंचा निष्ठावंत आहे. मी दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने ते साध्य झालं नाही. मात्र, भविष्यात हे दोघे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT