Raju Patil latest statement on Maharashtra issues Sarkarnama
मुंबई

KDMC Politics : 'मी खानदानी,टेंडरच्या पैशातून मोठा झालो नाही', राजू पाटील आक्रमक; चव्हाण, म्हात्रेंवर तुटून पडले

Raju Patil Raju Patil : माजी आमदार राजू पाटील म्हणाले, तो रवी कुठे? या माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा आक्षेप कोठे ही बॅच लावून जाण्याबाबत होता.

शर्मिला वाळुंज

Raju Patil News : कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावा रविवारी उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध पक्षांतील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनसेत प्रवेश केला. या वेळी मनसे नेते तथा माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर विकासाच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली.

पाटील म्हणाले, "रवींद्र चव्हाण डोंबिवलीचे आमदार होते, तसेच त्यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री म्हणूनही काम पाहिले. मात्र, डोंबिवलीच्या विकासासाठी त्यांनी नेमके कोणते ठोस काम केले, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे," अशी हल्लाबोल चव्हाण यांच्यावर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी तसेच आपल्या विरोधात सोशल मीडियावर जाणीवपूर्वक ट्रोलिंग करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

पुढे बोलताना ते म्हणाले, "मी खानदानी आहे. टेंडरच्या पैशातून गाड्या-घोड्या घेऊन मोठा झालो नाही. तुमचा दादा रिक्षा चालवत होता, तेव्हा मी मर्सिडीजमध्ये फिरत होतो. संपत्तीचा माज दाखवणाऱ्यांपैकी मी नाही, राजकारणात मतभेद असू शकतात; मात्र विकासाच्या चार चांगल्या गोष्टी घेऊन या, आपण एकत्र काम करण्यास तयार आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाषणादरम्यान राजू पाटील यांनी भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्यावरही टीका केली. "'तो रवी कुठे?' या माझ्या वक्तव्याचा जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. माझा आक्षेप कोठे ही बॅच लावून जाण्याबाबत होता. पण आता माझा दीपेश म्हात्रे यांना सल्ला आहे. त्यांनी तो बॅच लावूनच फिरावे, म्हणजे ते नेमके कोणत्या पक्षात आहेत, हे सर्वांनाच समजेल," असा टोला त्यांनी लगावला. तसेच, "सूर्यावर थुंकू नका, असे सांगणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे," अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली.

'त्या' कार्यकर्त्यांची घरवापसी

मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपमध्ये गेलेल्या काही मनसे पदाधिकाऱ्यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केल्याचा दावा यावेळी करण्यात आला. तसेच अनेक नवीन कार्यकर्त्यांचे पक्ष प्रवेश देखील झाले. नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहनही करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT